• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणनंतर आता या देशावर अमेरिका करणार हल्ला, ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाची घोषणा, जगभरात मोठी खळबळ

March 16, 2026 by admin Leave a Comment


इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे आखाती देशांमधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा देखील ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे इराणने होमूर्ज स्ट्रेट बंद केलं आहे. इराणने होमूर्ज स्ट्रेट बंद केल्यामुळे अनेक जहाजं तिथे अडकून पडली आहेत. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते, त्यापैकी सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक ही होमूर्ज स्ट्रेटमधून होते. त्यामुळे सध्या जगातील अनेक देशांवर भीषण ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आज या युद्धाचा 17 वा दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरू आहेत, तर दुसरीकडे इराने देखील आपल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलच्या मनात दहशत निर्माण केली आहे. संपूर्ण जग युद्धाच्या आगीमध्ये होरपळून निघत असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका देशाविरोधात थेट युद्धाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

इराणविरोधातील युद्ध संपल्यानंतर आता आम्ही क्यूबाविरोधात कारवाई करू शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिका क्यूबासोबत करार देखील करू शकते, मात्र जर करार झाला नाही आणि आम्हाला जर गरज वाटली तर आम्हाला त्यांच्याविरोधात जे करायचं आहे ते आम्ही करू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की सध्या तरी आमचं लक्ष हे केवळ इराणवर आहे. आम्ही इराणसोबत लढत आहोत, क्यूबा विरोधात इराणसोबतचं युद्ध संपल्यानंतर कारवाई करू, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे, ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

जर क्यूबाची करार करण्याची तयारी असेल तर मला वाटतं हा प्रश्न लवकर सुटू शकतो. मात्र जर करार झाला नाही तर आम्हाला वाटेल ते त्यांच्याविरोधात आम्ही करू. आमचं क्यूबासोबत बोलणं सुरू आहे. मात्र पहिल्यांदा आधी आम्ही आता इराणविरोधातील कारवाई पूर्ण करू त्यानतंर क्यूबाचा प्रश्न सोडवू, ज्यापद्धतीने आमचं क्यूबासोबत बोलणं सुरू आहे, त्यावरून तरी वाटत आहे की, क्यूबा आमच्यासोबत करार करू शकतो. करार झाला तर अनेक प्रश्नांवर शांततेच्या मार्गाने तोडगा निघेल अन्यथा करवाई करावी लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची इतर देशांसोबतची भूमिका ही अशीच राहिली तर जगात एक दिवस नक्की महायुद्धाला सुरुवात होईल, अशी भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in