• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणच्या विरोधात आणखी एका मुस्लीम देशाने दंड थोपटले, समुद्रात पाडली इराणची मिसाईल…

March 9, 2026 by admin Leave a Comment


इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणने अरब राष्ट्रांवरही हल्ले सुरु केले. त्यामुळे या अरब राष्ट्रांपैकी तुर्कीने आता या युद्धात इराण विरोधात थेट एण्ट्री घेतली आहे. तुर्कीने इराणकडून येणारे एक बॅलेस्टिक मिसाईल पूर्व भूमध्यसागरात पाडले आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने इराणला इशारा दिला आहे की या भागातील सुरक्षा आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनास धोक्यात घालण्याचा प्रयत्न करु नका. तुर्कीला जर कोणताही धोका निर्माण झाला तर आम्ही कोणतेही पाऊल विनासंकोच उचलू असाही इशारा तुर्कीने इराणला दिला आहे.

इराणवर २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्राईलने संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे. त्यानंतर इराण अनपेक्षितपणे इस्राईलसह शेजारील मुस्लीम देशातील अमेरिकेच्या तळांना टार्गेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता सौदी अरबचा पाकिस्तानशी संरक्षण करार असल्याने आता मुस्लीम देश पाकिस्तान सौदीच्या संरक्षणसाठी इराणला भिडणार काय असा सवाल असताना आता तुर्कीने थेट इराणला चॅलेज दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याआधी तुर्कीने उत्तर सायप्रस येथे युद्ध नौकांचा मोठा ताफा तैनात केला आहे. तुर्कीने उत्तर सायप्रस येथे एफ-१६ फायटर जेट्स आणि एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली आहे. आता तुर्कीने इराणच्या बॅलेस्टिक मिसाईलला हवेतच नष्ट केले आहे. तुर्कीने हे पाऊल इराणने सायप्रसवर ड्रोन्सने हल्ला केल्यानंतर उचलले आहे. तुर्की आणि सायप्रस हे शेजारी देश आहेत.

पूर्व भूमध्यसागरापर्यंत युद्ध पसरणार ?

उत्तर सायप्रसवर तुर्कीचे नियंत्रण आहे. उत्तर सायप्रसमध्ये तुर्कीने एफ-१६ विमाने तैनात केली आहेत. इराणच्यावतीने इराणचे समर्थक येथे हल्ला करु शकतात अशी धास्ती आता तुर्कीला वाटत आहे. याच्या आधी तुर्कीने इराणला इशारा दिला होता की त्याच्या हवाई क्षेत्रा जवळ कोणतेही मिसाईल येऊ नये याची काळजी घेतली जावी. परंतू इराणने याकडे दुर्लक्ष केले. यानंतर दोघांकडून आरोपप्रत्यारोप झाले. त्यानंतर तुर्कीने उत्तर सायप्रस येथे एफ-१६ फायटर जेट्स तैनात केले आणि एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली आहे. आता तर इराणने उत्तर सायप्रसवर हल्ला केला तर तुर्की त्यास प्रत्युत्तर देणार आहे. त्यामुळे आता हे युद्ध पश्चिम आशियाकडून पूर्व भूमध्यसागरापर्यंत पसरली आहे.

सुन्नी बहुल देश

१ मार्च रोजी इराण समर्थित अतिरेकी गट हेजबोल्लाहने लेबनॉनवरुन इराणी शाहेद-१३६ ड्रोन लाँच केले होते. हे ड्रोन ब्रिटीश RAF अक्रोटिरी एअर बेसवर कोसळले. हा विभाग सायप्रसच्या दक्षिण भागात आहे. हा युरोपिय संघ सदस्य सायप्रसवर मोठा हल्ला होता. तुर्कीने यास क्षेत्रिय अस्थिरतेचा पुरावा मानले आहे. तुर्की हा नाटो सदस्य असून सुन्नी बहुल देश आहे आणि इराणला प्रतिस्पर्धक मानतो.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in