• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणच्या ‘त्या’ कठोर मागण्या आणि अटी…ज्यामुळे ‘इस्लामाबाद टॉक्स’ फेल

April 12, 2026 by admin Leave a Comment


इराण युद्धाला ४० दिवस पूर्ण झाल्यानंतर हे युध्द रोखण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराणमध्ये महत्वपूर्ण वाटाघाटी झाल्या. सुमारे २१ तास शांततेसाठी बोलणी चालल्यानंतर कोणताही तोडगा न निघता ही बैठक संपल्याची घोषणा करण्यात आली. ही बैठक ४० दिवस सुरु असलेल्या क्षेत्रीय तणाव आणि सैन्य संघर्षादरम्यान खूप महत्वाची मानली जात होती. परंतू दोन्ही पक्षाचे समाधान झाले नाही. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर घालिबफ यांनी बैठक कोणत्याही तोडग्याविना संपल्यानंतर म्हटले आहे की अमेरिका आमचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरला.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लागोपाठ केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की इराणी शिष्ठमंडळाने दूरदर्शी आणि सकारात्मक प्रस्ताव सादर केले. परंतू अमेरिकन पक्ष त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरला. घालिबफ जे स्वत: इराणी शिष्ठमंडळात सामील होते. त्यांनी आपल्या सोशल साईट पोस्टमध्ये हे देखील संकेत दिले की चर्चा संपूर्णपणे अपयशी झाली नाही. घालिबफ म्हणाले की,’ अमेरिका आणि इराणचे तर्क आणि सिद्धांत समजलेला आहे. आणि त्याला हे निश्चित करायचे तो आमचा विश्वास मिळवू शकतो की नाही.’

त्यांनी हे म्हटले की गेल्या दोन युद्धाच्या अनुभवाने इराणला सावध केले आहे.आणि त्यामुळे अमेरिकेसोबत होणाऱ्या वाटाघाटीत बाबत आम्हाला घाई नाही.मोहम्मद बाघेर घालिबफ यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की इराण कुटनितीला आपल्या अधिकारांच्या संरक्षणाचा एक महत्वाचे माध्यम मानतो. आणि तो आपल्या राष्ट्रीय हितांच्या सुरक्षेसाठी हरऐक प्रयत्न करणे सुरु ठेवेल. त्यांच्या या वक्तव्यांने हे स्पष्ट झाले आहे की इराण चर्चेसोबतच सैन्य आणि रणनितीक मोर्चावरही सक्रीय राहू इच्छीतो.

घालिबफ यांनी पाकिस्तानचे मानले आभार

घालिबफ यांनी या बैठकीचे यजमानपद भुषवणाऱ्या पाकिस्तानचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की मी या बैठकीचे आयोजन शक्य करण्यात सहकार्य केल्याबद्दल मी पाकिस्तानचे आभार व्यक्त करतो आणि तेथील जनतेला सलाम करतो. मोहम्मद बाघेर म्हमाले की इराण ९ कोटी लोकांचे एक मजबूत राष्ट्र आहे.मी आपल्या देशवासियांना धन्यवाद करतो. ज्यांनी सर्वोच्च नेत्याच्या मार्गदर्शनात रस्त्यावर उतरुन आमचे समर्थन केले आणि आम्हाला युद्धाच्या आशीवार्दासह पुढे केले.ते म्हणाले की या २१ तासांच्या प्रदीर्घ आणि कठीण बैठकीत सामील झालेल्या आपल्या साथीदारांना म्हणतो, खूप चांगले काम केले. ईश्वर तु्म्हाला शक्ती देओ, आपला आवडता इराण नेहमीच झिंदाबाद आणि कायम राहील !

इराणची लेबनॉनमध्ये युद्धबंदीची मागणी

इराणने या बैठकी दरम्यान १० सूत्री प्रस्ताव सादर केला, त्यात दोन मागण्या महत्वाच्या होत्या. पहिली लेबनॉनमध्ये लागलीच युद्धविराम लागू व्हावा आणि दुसरी, कतार समेत विदेशी बँकात जमा असलेले सुमारे ६ अब्ज डॉलरची त्यांची संपत्ती अनफ्रीज केली जावी. दोन आठवड्याच्या अस्थायी संघर्ष विरामाबाबत अमरिकेसोबत झालेल्या सहमतीमध्ये लेबनॉनचा देखील मुद्दा समाविष्ठ होता. ज्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियातील पोस्टमध्ये स्पष्ट उल्लेख केला होता. मात्र, अमेरिकन पक्षाने या मागण्यांवर कठोर भूमिका दाखवली, ज्यामुळे चर्चेत गतिरोध कायम राहिला.

आण्विक कार्यक्रम आणि होर्मुझवर इराण ठाम राहिला

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांनी देखील दुजोरा दिला की परिषद कोणत्याही तोडग्या शिवाय संपली आहे. त्यांनी सांगितले की अमेरिकेने इराण समोर आपला अंतिम आणि सर्वात चांगला प्रस्ताव ठेवला होता. व्हान्स यांच्या मते अमेरिकेच्या प्रस्तावाचा मुख्य फोकस हा होता की इराण स्पष्ट रुपाने हे सांगावे की तो आण्विक शस्रास्र क्षमता विकसित करणार नाही. त्यांच्या मते या महत्वाच्या मुद्यावर इराणकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. जे सामंजस्य करारातील सर्वात मोठा अडथळा ठरले. सूत्रांच्या मते चर्चेत इराणच्या आण्विक कार्यक्रमाशिवाय स्ट्रेट ऑफ होर्मुझशी संबंधित ट्रान्झिस्ट आणि सुरक्षा मुद्दे देखील वादाचे प्रमुख कारण बनले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle : आशाताईंचे ते शेवटचे गाणे..जे आता कधीच पूर्ण होणार नाही..
  • IPL 2026, GT vs LSG: गुजरात टायटन्सकडून पराभव होताच ऋषभ पंतने असं फोडलं खापर, म्हणाला…
  • IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, मॅचविनर बॉलरचा पत्ता कट, Playing 11 मध्ये कोण?
  • आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यातील एक विचित्र योगायोग; तुम्हालाही आश्चर्य वाटेल
  • आशाताईंचं 45 वर्षांपूर्वीचं अजरामर गाणं, ज्याचे बोल घेतात काळजाचा ठाव, रेखाच्या डान्समुळेही ठरलं सर्वांचं फेव्हरेट!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in