• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणचा अमेरिकाला युद्धात मोठा दणका! भारतालाही इशारा, थेट म्हटले, आम्ही त्यांना…

March 13, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण युद्धाला काही आठवडे पूर्ण झाली आहेत आणि हे युद्ध पुढेही काही दिवस सुरू राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण पराभव स्वीकारत नसून अमेरिका आणि इस्त्रायलला नाकीनऊ आणत आहे. इराणच्याही मोठ्या शहरांना टार्गेट करत हल्ले करण्यात आले. या युद्धात इराणच्या विरोधात आखाती देश अमेरिकेच्यासोबत होते. छुपा पाठिंबा त्यांचा या युद्धाला होता. मात्र, आता या युद्धाचा थेट फटका आखाती देशांना बसला असून अमेरिकेबद्दलची त्यांची भूमिका बदलली आहे. अमेरिकेने म्हटले होते की, इराणच्या हातात आता काहीच शिल्लक राहिले नसून त्यांची सर्व लष्करी ताकद संपली आहे. त्यानंतर इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी थेट हे युद्ध सुरू राहणार असल्याचे म्हटले. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून इराणने आपल्या हातात ठेवला असून तो बंद केला. यामुळे अमेरिकेवर प्रचंड दबाव आहे. भारत आणि इराणमधील वाटाघाटीनंतर भारताकरिता हा मार्ग खुला करण्यात आला. मात्र, आता इराणकडून यावर मोठे विधान करण्यात आले.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक मोठे विधान आले आहे. ज्यानंतर भारताचे टेन्शन वाढले आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारताचेही जहाज सोडले जात नसल्याने भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. आता यादरम्यानच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी जहाजांना इराणी नौदलाशी समन्वय साधावा लागेल.

नाैदलासोबत बोलूनच तुम्ही जहाजांद्वारे तेल आणि वायू वाहतूक करू शकता. आता इराणकडून आलेल्या या विधानावरून हे स्पष्ट होते की, इराणी नाैदल होर्मुज सामुद्रधुनीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. इराणकडून भारताला स्पष्ट इशारा देत सांगण्यात आले की, नाैदलाची चर्चा करूनच त्यांना त्यांची जहाजे नेता येतील. इराणचा संकेत स्पष्ट आहे की, इस्त्रायल आणि अमेरिका आणि त्यांना समर्थन करणारे देश सोडून इतरांसाठी हा मार्ग खुला आहे.

इराणच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, काही देशांनी सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग काढण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला आणि चर्चा देखील झाली. आम्ही त्यांना सहकार्य केले. राहिला विषय इराणचा तर आमचा विश्वास आहे की, युद्धात सहकार्य करणाऱ्या देशांना होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गाचा फायदा होऊ नये, याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू
  • Pakistan-Saudi Arabia : इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक, फायटर जेट्स सौदी अरेबियात दाखल
  • आशा भोसले यांच्या निधनावर पाकिस्तानी सेलिब्रिटी हळहळले, पोस्ट करत म्हणाले…
  • अरेरे किती ते हाल! अशोक खरातच्या घशा खाली घास उतरेना, बायकोबद्दल विचारताच…
  • Asha Bhosle Movie: गायिकाच नव्हे अभिनेत्रीही, 79 व्या वर्षी केलं डेब्यू; आशा भोसलेंचा हा चित्रपट पाहिलाय का ? डोळ्यांत येईल पाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in