
महाराष्ट्र काँग्रेसने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्याची माहिती मिळते. महाविकास आघाडीमध्ये सहभागी असूनही काँग्रेसने हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या निर्णयामागे अनेक कारणे असल्याचे बोलले जाते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जास्त विसंबून न राहण्याच्या सूचना काँग्रेसने दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा पवित्रा घेतल्याचे दिसते. काँग्रेसने यापूर्वीही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत.
Leave a Reply