• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इतक्या कमी किंमतीत दारात उभी करा सनरूफवाली प्रीमियम कार,कंपनीने घटवले दर

February 5, 2026 by admin Leave a Comment


ज्यांना आता स्वस्तात दारात सनरुफची कार उभी करायची आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. हुंडई कंपनीने i20 हॅचबॅकला आणखी स्वस्त केले आहे. कंपनीने काही व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. त्यामुळे हुंडई i20 सुरुवाती किंमत 5.99 लाख (एक्स-शोरूम) रुपये झाली आहे. यामुळे प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये i20 ची पकड आणखी मजबूत होणार आहे. या कारची स्पर्धा Maruti Suzuki Baleno आणि Tata Altroz सारख्या कारशी आहे. किंमत कमी केली असली तर i20 च्या फिचर्स आणि सेफ्टी कोणतीही कपात झालेली नाही.

या किंमत कपातीचा सर्वात मोठा फायदा i20 Era व्हेरिएंट मिळाला आहे. जिला आता बेस मॉडेल केले आहे. कमी किंमत असूनही यात फिचर्स कायम आहेत. Era व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग, डिजिटल इंस्टुमेंट क्लस्टर, बॉडी कलर ORVM आणि डोअर हँडल, पुढे – मागे स्कीड प्लेट, टाईप-सी USB चार्जर आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग देखील मिळते. बेस मॉडेलमध्ये देखील प्रीमियम फिल आणि चांगली सेफ्टी दिली आहे.

सनरूफ मॉडेल देखील स्वस्त

Hyundai आता Magna Executive आणि Magna व्हेरिएंटच्या किंमती देखील बदलू शकते. आता यांची किंमत अनुक्रमे 6.74 लाख आणि 6.99 लाख रुपये(एक्स-शोरूम) आहे. Magna Executive व्हेरिएंटमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, TPMS, ऑटोमेटिक हेडलँप, किलेस एंट्री, इलेक्ट्रीकली एडजस्टेबल ORVM, स्टीअरिंगवर ऑडियो आणि ब्लूटूथ कंट्रोल,शार्क फिन एंटीना आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग सारखे फिचर्स मिळतात. Magna व्हेरिएंटमध्ये यापेक्षा जास्त आराम आणि सुविधा मिळते. उदा. इलेक्ट्रिक सनरूफ, LED DRLs, मागे AC वेंट्स आणि स्टोरेजसह फ्रंट आर्मरेस्ट असा प्रीमियम अनुभव मिळतो.

हे फिचर्स देत आहे कंपनी

याशिवाय Hyundai डीलरद्वारे 10.1- इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळत असून त्यात वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सोबत रिअर कॅमेरा मिळतो. याची किंमत 14,999 आहे आणि यावर तीन वर्षांची वॉरंटी दिली जाते. Hyundai i20 मध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे.हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल वा CVT गिअरबॉक्स सोबत येते. हे इंजिन 83 bhpची पॉवर आणि 114.7 Nm चा टॉर्क देते. चांगल्या मायलेजसाठी यात इंटीग्रेटड स्टार्टर जनरेटर देखील आहे. i20 सोबत आताही तीन वर्षे वा 1,00,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी मिळते. ज्यामुळे ग्राहकांचा या कारवर जास्त विश्वास बसतो.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी माफी मागणार नाही, कुणाल कामराने दिला बाळासाहेब ठाकरेंचा दाखला, नेमकं काय घडलं?
  • Maharashtra Weather Updates : आज दुपारी घरातच थांबा, 12 ते 4…, राज्यात आजपासून सुरू होणार उष्णतेचं टॉर्चर
  • इराणने मारली बाजी! ट्रम्प यांच्या एका पोस्टमुळे मोठे नुकसान, नेमकं काय घडलं?
  • Horoscope Today 12th April 2026 : रविवारी मिळणारी नशीबाची साथ, या 3 राशींना आज मिळणार तगडा फायदा, वाचा आजचं भविष्य
  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in