• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंधन बंद राहण्याची अफवा, पेट्रोल पंपावर रांगाच रांगा… कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

March 4, 2026 by admin Leave a Comment


मध्य पूर्वेत भयानक युद्धाला सुरुवात झाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून सातत्याने इराणवर हल्ला केला जात आहे. इराणनेही प्रत्युत्तर देत आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या युद्धामुळे जगभरातील कच्चा तेलाची पुरवठा साखळी खंडित झाली आहे. कारण अनेक तेलवाहू जहाजांवरही हल्ले केले जात आहेत. अशातच आता भारतासह जगभरातील देशांमध्ये कच्च्या तेलाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरली आहे. यासंबंधीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध शहरांमधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

परभणीत अफवा

आखाती देशात युद्ध सुरू झाल्याने रात्रीतून पेट्रोल बंद होणार असल्याची परभणीत अफवा पसरल्याने भीतीपोटी वाहनधारकांनी बाटल्या डब्बे घेऊन पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. गाडी फुल करून अनेकजण जमेल तसं पेट्रोल साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण म्हणत आहेत की, पेट्रोल बंद होणार आहे, तर कुणाला पेट्रोल 35 रुपयांनी महाग होणार असल्याची माहिती मिळाल्याने ही गर्दी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही पेट्रोल पंपावर गर्दी

छत्रपती संभाजी नगर मध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा पहायला मिळत आहेत. पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी उसळली आहे. आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळे पेट्रोल बंद होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरली आहे. त्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. तर सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरचे पेट्रोलियम डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी म्हटले की, पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, कोणताही पेट्रोल पंप बंद राहणार नाही. आज होळीमुळे काही पंप बंद होते. मात्र इंधन मिळणार नाही असा कोणताही प्रकार नाही. एक तारखेला रविवार असल्यामुळे डेपोला सुट्टी होती आणि आज डेपो बंद होता, त्यामुळे काही ठिकाणी इंधन संपले होते.

हिंगोली-नांदेडमध्येही वाहन चालकांची गर्दी

नांदेडमध्येही सोशल मीडियावर आखाती देशांमध्ये युद्ध पेटल्याने पेट्रोल महाग होणार अफवा पसरली आहे. या अफवेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील बाबा पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र पेट्रोल टंचाई नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती पंप चालकांनी दिली आहे. हिंगोलीतही पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in