• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंजीनिअर ते फायनान्स क्षेत्रात उडी, 27 वर्षीय ध्वित मेहताने पटकावलं सुवर्णपदक; IIM बंगळुरूमध्ये उल्लेखनीय कामगिरी

April 9, 2026 by admin Leave a Comment


वडोदऱ्यातील आणंद इथल्या 27 वर्षीय ध्वित मेहता या तरुणाने आयआयएम बंगळुरू या संस्थेच्या अत्यंत प्रतिष्ठित ‘वॉल ऑफ फेम’मध्ये स्थान मिळवलं आहे. भारतातील कोटिंग लॅबपासून ते युरोपमधील कॉर्पोरेट क्षेत्रातील कारकिर्दीपर्यंत त्याने उल्लेखनीय प्रवास केला आहे. याआधी आदित्य शाह (पीजीपी 2022-24) यांनी आयआयएम बंगळुरू इथं शैक्षणिक कामगिरीसाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर अशी सुवर्ण कामगिरी करणारा ध्वित हा दुसरा गुजराती तरुण ठरला आहे. ध्वितचा हा प्रवास आणंद इथल्या आनंदालय या शाळेतून सुरू झाला, जिथे त्याने 2016 मध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने IIIT अलाहाबाद इथं कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक आणि एमटेक अशी दुहेरी पदवी घेतली.

कोडिंगपासून सुरुवात

ध्वितला लहानपणापासूनच कोडिंगची प्रचंड आवड आहे. कोडिंमध्ये उच्च दर्जाचा तांत्रिक अनुभव मिळवण्यासाठी त्याने गुजरातमधील जवळच्या पर्यायांऐवजी आयआयएम बंगळुरूची निवड केली. कोरोना महामारीच्या काळात त्याने अमेरिकेतील एका क्लाऊड कंपनीत कामाला सुरुवात केली. इथूनच त्याने कोडिंगच्या प्रोफेशनल विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तो मायक्रोसॉफ्टमध्ये रूजू झाला. जुलै 2022 मध्ये तो सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून नॉर्वे या देशात स्थलांतरित झाला. दोन वर्षांच्या काळात त्याला बढती मिळाली आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात त्याने स्थिर करिअर निर्माण केलं.

फायनान्स क्षेत्राची आवड

ध्वितसाठी हे सगळं पुरेसं नव्हतं. कोडिंगमध्ये प्रगती करत असतानाच त्याला वित्त क्षेत्राकडे अधिकाधिक ओढ वाटू लागली. या क्षेत्राप्रती असलेल्या उत्सुकतेपोटी त्याने नोकरी करतानाच अत्यंत आव्हानात्मक असा चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्टचा (CFA) प्रोग्राम हाती घेतला. विशेष म्हणजे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तो लेव्हल I आणि II मध्ये उत्तीर्ण झाला. हीच कामगिरी त्याच्यासाठी पुढे अत्यंत निर्णायक ठरली. अखेर 2024 मध्ये त्याने नॉर्वेमधील मायक्रोसॉफ्ट कंपनीची नोकरी सोडली आणि एमबीए करण्यासाठी तो भारतात परतला. 2021 मध्ये फारशी तयारी न करताही त्याने CAT परीक्षेत 98.5% मिळवले होते. परंतु त्यावेळी त्याने आयआयएम इंदूरमध्ये प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतला होता.

नोकरी सोडून एमबीएसाठी भारतात परतला

आयआयटी आणि इतर नामांकित संस्थांमधून आयआयएम बंगळुरूमध्ये आलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये ध्वित मेहताची कामगिरी उल्लेखनीय ठरली. सीएफएची पार्श्वभूमी आणि सातत्य यांमुळे त्याला फायनान्स क्षेत्रात विशेष फायदा मिळाला. या सर्वांची परिणती सुवर्णपदक पटकावण्यात झाली. 27 मार्च 2026 रोजी संस्थेच्या 51 व्या दीक्षांत समारंभात ध्वितला सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं. “माझ्यासाठी हे फक्त माझं यश नाही, तर हे माझं कुटुंब, मित्र आणि आयआयएम बंगळुरू इथल्या प्राध्यापकांच्या पाठिंब्याचं प्रतीक आहे”, अशा शब्दांत त्याने कृतज्ञता व्यक्त केला.

ध्वित आता मुंबईतील एका प्रतिष्ठित कंपनीत इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. कोडिंगपासून कॅपिटल मार्केट्सपर्यंतचा त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. याचं श्रेय तो CFA ला देतो. इंजीनिअरिंगची पार्श्वभूमी असूनही फायनान्समध्ये प्रवेश करणं CFA मुळे शक्य झाल्याचं तो सांगतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?
  • मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला
  • Sanjay Raut On Operation Tiger | ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’
  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in