
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. आशा भोसले यांची नात झनाई भोसलेनं त्यांना छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केलं असल्याचं स्पष्ट केलं. आशा भोसले यांना प्रचंड थकवा जाणवत असून छातीत संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या लवकर बऱ्या होतील, असं झनाईने सांगितलं. याप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘आशा भोसलेजी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं ऐकून मी अत्यंत चिंतेत आहे’, असं मोदींनी लिहिलं आहे.
पंतप्रधान मोदींचं ट्विट-
नरेंद्र मोदींनी आशा भोसले यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘आशा भोसलेजी यांना रुग्णालयात दाखल केल्याचं ऐकून मी अत्यंत चिंतेत आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करत आहे.’
Deeply concerned to hear that Asha Bhosle Ji has been admitted to hospital. Praying for her good health and a speedy recovery.
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2026
आशा भोसले यांची नात झनाईने रविवारी रात्री इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित आशा भोसले यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. ‘माझी आजी, आशा भोसले यांना अत्यंत थकवा जाणवल्याने आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी आम्ही विनंती करतो. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सर्वकाही ठीक होईल, अशी आम्हाला आशा आहे. तसंच या संदर्भात आम्ही तुम्हाला लवकरच सकारात्मक माहिती देऊ’, असं तिने म्हटलंय.
View this post on Instagram
आशा भोसले या गेल्या आठ दशकांहून अधिक काळापासून भारतीय संगीतसृष्टीत सक्रिय आहेत. 2023 मध्ये त्यांनी दुबईत गाण्यांचा जाहीर कार्यक्रम करून आपला नव्वदावा वाढदिवस मोठ्या उत्साहात सादरा केला होता. लता मंगेशकर यांच्यानंतर आशा भोसले यांचंच नाव घेतलं जातं. त्यांनी विविध भाषा आणि संगीत प्रकारांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. शंकर-जयकिशन, आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, इलैयाराजा, बप्पी लाहिरी, ए. आर. रेहमान यांसारख्या मोठमोठ्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं आहे.
(@zanaibhosle)
Leave a Reply