
Asha Bhosle Famous Songs : गायन जगतातील प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवुड पोरके झाल्याची भावना व्यक्त केली जात आहेत. आशा भोसले यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. यातील काही गाण्यांना 40 ते 50 वर्षे झालेली आहेत. परंतु अजूनही आशाताईंनी गायलेल्या या गाण्यांची तेवढीच क्रेझ आहे. आजकालची जेन झी देखील आशाताईंनी गायलेली गीते आवडीने ऐकते. यातीलच एक गाणे लोकांना खूप आवडते. हे गाणे अजूनही लाखो लोकांच्या आवडीचे आहे.
ते प्रसिद्ध गाणं कोणतं?
आशाताईंनी आपल्या गायनातील करिअरमध्ये आतापर्यंत हजारो गाणी गायलेली आहेत. विशेष म्हणजे ही गाणी फक्त मराठी किंवा हिंदी भाषेतलीच नाहीत. इतरही भाषांत त्यांनी गाणी गेयलेली आहेत. त्यांनी गायलेल्या काही गाण्याचे बोल आजही काळजाचा ठाव घेतात. त्यांच्या अशाच एका गाण्याचे नाव ‘इन आँखोंकी मस्ती के’ असे आहे. या गाण्याला आशाताईंचा आवाज आहे. या गाण्यात आशाताईंच्या आवाजाची जादू पाहायला मिळते. उमराव जान या चित्रपटातील हे गीत आहे.
रोज हजारो लोक ऐकतात ते गाणं
उमराव जान हा चित्रपट 1981 साली रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेत्री रेखाचीही भूमिका आहे. एकीकडे आशाताईंचा आवाज आणि त्याच्या जोडीला अभिनेत्री रेखा
इतरही अनेक गाणी प्रसिद्ध
दरम्यान, आशाताईंनी गायलेली अनेक गितं आजही प्रसिद्ध आहेत. ये मेरा दिल, ओ हसिना जुल्फो वाली, चुरा लिया है तुमने जो दिल को, केहदू तुम्हे या चुप रहूँ, सजना है मुझे असे गाणे आजही लाखो लोक ऐकतात. यूट्यूबवर या गाण्याचा व्हिडीओ तसेच ऑडिओ लोक सर्च करून ऐकतात.
Leave a Reply