• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आले-हिरव्या मिरचीची पेस्ट ‘या’ 4 पद्धतीने स्टोअर केल्याने जास्त दिवस राहील फ्रेश

March 4, 2026 by admin Leave a Comment


स्वंयपाक बनवताना प्रत्येक रेसिपीमध्ये आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट सहसा वापरली जाते. ते विशेषतः भाज्या, डाळ, ग्रेव्ही किंवा चटण्यांमध्ये वापरली जाते. मात्र रोजच्या कामाला जाण्याच्या घाईत किंवा दररोज पेस्ट तयार करण्याऐवजी बरेच लोकं आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट अधिच जास्त प्रमाणात तयार करतात. मात्र अयोग्य पद्धतीने स्टोअर केल्याने ही पेस्ट लवकर खराब होते आणि वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही जर ही आले हिरव्या मिरचीची पेस्ट नीट ठेवल्यास ती दीर्घकाळ ताजी आणि फ्रेश ठेवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण अशाच काही पद्धती जाणून घेऊयात जे आले हिरव्या मिरचीची पेस्ट अधिक दिवस चांगली राहील.

आले हिरव्या मिरचीची पेस्ट हवाबंद डब्यात ठेवा

पेस्ट तयार केल्यानंतर ती स्वच्छ, कोरड्या, हवाबंद डब्यात ठेवा. लक्षात ठेवा की हवेच्या संपर्कात आल्याने ही पेस्ट लवकर खराब होऊ शकते आणि त्याची चव बदलू शकते. तसेच तुम्ही ज्या डब्यात किंवा कंटेनर मध्ये ही पेस्ट ठेवली असेल तो डबा नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. या पद्धतीने पेस्ट सुमारे एक आठवडा टिकेल.

तेल आणि मीठ मिसळा

आले आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट अधिक दिवस चांगली राहावी यासाठी त्यावर थोडे मीठ आणि मोहरीचे किंवा रिफाइंड तेल थोड्याशा प्रमाणात मिक्स करून घ्या. तेल हवा आत जाण्यापासून रोखते, तर मीठ संरक्षक म्हणून काम करते. यामुळे पेस्टचे शेल्फ लाइफ वाढते.

बर्फाच्या क्यूब ट्रेमध्ये पेस्ट फ्रीज करा

दीर्घकाळ आले हिरव्या मिरचीची पेस्ट ठेवण्यासाठी, पेस्ट बर्फाच्या क्यूब ट्रेमध्ये भरा आणि फ्रीजरमध्ये ठेवा. क्यूब्स तयार झाल्यावर, ते काढा आणि झिपलॉक पाऊचमध्ये ठेवा. जर तुम्हाला स्वंयपाक करताना रेसिपीमध्ये या पेस्टचा वापर करायचा असेल तर काही क्यूब्स काढा आणि थोडा वेळ एका छोट्या वाटीत काढून ठेवा काही वेळानंतर पेस्टचा वापर करा. ​​अशा प्रकारे, पेस्ट महिने साठवता येते.

कोरडा चमचा वापरा

बऱ्याच वेळा पेस्ट काढण्यासाठी ओल्या चमच्याचा वापर करतात. यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे पेस्ट लवकर खराब होते. म्हणून आले आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट काढण्यासाठी नेहमीच स्वच्छ, कोरड्या चमच्या वापर करणे महत्वाचे आहे. पेस्ट काढल्यानंतर ते ताबडतोब रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut Uncut PC | हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
  • कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?
  • मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला
  • Sanjay Raut On Operation Tiger | ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in