• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका

April 9, 2026 by admin Leave a Comment


झी मराठी वाहिनीवरील 'कमळी' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कथानकातील सतत येणारी मनोरंजक वळणं पात्रांमधील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांमधील चढ-उतार यामुळे ही मालिका अधिकच उत्कंठावर्धक बनत आहे. कमळी आणि ऋषी यांच्या नात्यातील नवीन घडामोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे जी त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'कमळी' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कथानकातील सतत येणारी मनोरंजक वळणं, पात्रांमधील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांमधील चढ-उतार यामुळे ही मालिका अधिकच उत्कंठावर्धक बनत आहे. कमळी आणि ऋषी यांच्या नात्यातील नवीन घडामोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे, जी त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे.

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिची ‘अनामिका’ या भूमिकेतून मालिकेत विशेष एण्ट्री झाली आहे. अनामिका ही धाडसी सकारात्मक आणि स्पष्टवक्ती मुलगी असून तिच्या स्वभावामुळे कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे.

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिची ‘अनामिका’ या भूमिकेतून मालिकेत विशेष एण्ट्री झाली आहे. अनामिका ही धाडसी, सकारात्मक आणि स्पष्टवक्ती मुलगी असून, तिच्या स्वभावामुळे कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे.

या खास भागांच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल आर्या आंबेकर म्हणाली मला ओशन फिल्म कंपनीकडून या खास भूमिकेसाठी  फोन आला होता. एका कॉलेजमधील म्युझिक टीचर म्हणजेच संगीत प्राध्यापकाची भूमिका करण्याबद्दल त्यांनी विचारलं. अभिनय आणि संगीत यांचा खूप जवळचा संबंध आहे असं मी नेहमी मानते विशेषतः संगीताशी संबंधित भूमिका करताना. त्यामुळे मला ही भूमिका लगेच आवडली आणि मी होकार दिला.

या खास भागांच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल आर्या आंबेकर म्हणाली, “मला ओशन फिल्म कंपनीकडून या खास भूमिकेसाठी फोन आला होता. एका कॉलेजमधील म्युझिक टीचर, म्हणजेच संगीत प्राध्यापकाची भूमिका करण्याबद्दल त्यांनी विचारलं. अभिनय आणि संगीत यांचा खूप जवळचा संबंध आहे असं मी नेहमी मानते, विशेषतः संगीताशी संबंधित भूमिका करताना. त्यामुळे मला ही भूमिका लगेच आवडली आणि मी होकार दिला.”

झी मराठी हे माझ्यासाठी नेहमीच खूप खास व्यासपीठ राहिलं आहे. माझ्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे इथंच घडले. मी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये स्पर्धक होते आणि नंतर परीक्षक म्हणूनही काम केलं. झी मराठीच्या चित्रपटांमध्येही मी काम केलं आहे इथंच माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला तसंच त्यांच्या मालिकांसाठी मी शीर्षक गीत  आणि प्रेमगीतं गायली आहेत असं ती पुढे म्हणाली.

झी मराठी हे माझ्यासाठी नेहमीच खूप खास व्यासपीठ राहिलं आहे. माझ्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे इथंच घडले. मी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये स्पर्धक होते आणि नंतर परीक्षक म्हणूनही काम केलं. झी मराठीच्या चित्रपटांमध्येही मी काम केलं आहे, इथंच माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला, तसंच त्यांच्या मालिकांसाठी मी शीर्षक गीत आणि प्रेमगीतं गायली आहेत,” असं ती पुढे म्हणाली.

माझ्या व्यक्तिरेखेचं नाव ‘अनामिका’ आहे. ती खूप धाडसी आणि सकारात्मक मुलगी आहे. तिचे संवाद खूप ठाम आहेत. जे आपण खऱ्या आयुष्यात सहज बोलत नाही. मी स्वतः थोडी लाजरी आहे पण अनामिका खूप व्यक्त होणारी आणि निडर आहे. ती तिचं मत स्पष्टपणे मांडते आणि कमळी-ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण करण्यात तिची मोठी भूमिका असणार आहे असं आर्याने सांगितलं.

माझ्या व्यक्तिरेखेचं नाव ‘अनामिका’ आहे. ती खूप धाडसी आणि सकारात्मक मुलगी आहे. तिचे संवाद खूप ठाम आहेत. जे आपण खऱ्या आयुष्यात सहज बोलत नाही. मी स्वतः थोडी लाजरी आहे, पण अनामिका खूप व्यक्त होणारी आणि निडर आहे. ती तिचं मत स्पष्टपणे मांडते आणि कमळी-ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण करण्यात तिची मोठी भूमिका असणार आहे,” असं आर्याने सांगितलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी
  • अभिनेत्रीचा 14 वर्षांचा संसार मोडला; पतीचे 2-4 नाही तर 9 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड
  • US, Israel Ceasefire : अमेरिकेनं पाकिस्तानला वेड्यात काढलं, ट्रम्प यांच्याकडून शरीफ, मुनीर यांचा मोठा गेम, रिपोर्टने मोठी खळबळ
  • काय…फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या हे आरोग्यदायी फायदे
  • 1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in