• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएल स्पर्धेतील सलग पाच सामन्यात जसप्रीत बुमराहने काय केलं? मुंबई इंडियन्स संघ अडचणीत

April 13, 2026 by admin Leave a Comment


जसप्रीत बुमराह जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. पण आयपीएल स्पर्धेतील पाच सामन्यात त्याची आकडेवारी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात कामगिरी पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेतील मागच्या पाच सामन्यात जसप्रीत बुमराह विना विकेट ठरला आहे. हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. मागच्या पाच सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. आयपीएल 2025 स्पर्धेतील शेवटच्या सामन्यापासून ही मालिका सुरू आहे. यंदाच्या चार सामन्यात त्याला विकेट मिळाली नाही. (Photo: IPL/BCCI)

क्रिकेट डेटा आणि विश्लेषण वेबसाइट क्रिकविझनुसार, बुमराहला सलग 122 चेंडूंमध्ये एकही बळी घेता आलेला नाही. आयपीएलमधील ही त्याची सर्वात मोठी विकेट न घेतलेली कामगिरी आहे. त्यामुळे मागच्या सामन्यात बुमराह अस्वस्थ झाल्याचंही पाहायला मिळालं. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2025 पंजाब किंग्सविरुद्ध 4 षटकात 40 धावा, आयपीएल 2026 केकेआरविरुद्ध 4 षटकात 35 धावा, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 षटकात 21 धावा, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 3 षटकात 32 धावा, आरसीबीविरुद्ध 4 षटकात 35 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळालेली नाही. (Photo: IPL/BCCI)

भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने बुमराहच्या विकेट न मिळालेल्या कामगिरीबाबत भाष्य करत सांगितले की, बुमराहकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यासाठी इतर गोलंदाजांनी आपली कामगिरी उंचावण्याची गरज आहे. बुमराह बहुतेक वेळा अशा स्थितीत गोलंदाजीसाठी येतो, जिथे प्रतिस्पर्धी संघ वरचढ असतो. (Photo: IPL/BCCI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : कॅप्टन हार्दिकला मोठा झटका, एक चूक महागात, झटक्यात थेट लाखोंचा दंड, कारण?
  • IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की..
  • स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
  • आशा भोसले यांच्या कुटुंबात आहेत मोठ-मोठे कलाकार, एकाने खलनायक म्हणून केलंय बॉलिवूडवर राज्य
  • Asha Bhosle | स्वरसाम्राज्ञीला अखेरचा निरोप! आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in