• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं

February 15, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. तीने 2018 साली गायक निक जोनाससोबत लग्न केलं. प्रियांका चोप्रा ही तिचा पती निक जोनासपेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे त्यावेळी या लग्नाची जोरदार चर्चा झाली, दोघांच्या वयावरूनही त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं. मात्र या ट्रोलिंगकडे दोघांनीही दुर्लक्ष केलं. प्रियांका आणि निक जोनास यांच्या लग्नाला आता आठ वर्ष पूर्ण झाले आहेत. 2022 मध्ये प्रियाकां चोप्राने एका मुलीला देखील जन्म दिला. मालती मैरी असं या मुलीचं नाव आहे. दरम्यान प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र घटस्फोटाची चर्चा काय त्यांची पाठ सोडण्यास तयार नाहीये. प्रियका आणि निक जोनास हे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर सुरू असते, या चर्चेवर निक किंवा प्रियांका दोघेही फार काही व्यक्त होत नाहीत. मात्र यावेळी निक आणि तिच्या घटस्फोटाची चर्चा करणाऱ्यांना प्रियांकाने चांगलंच सुनावलं आहे. तसेच आपलं निक सोबतच नात किती मजबूत आहे, यावर देखील तिने प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार एका मुलाखतीमध्ये बोलताना प्रियांका चोप्राने आपल्या आणि निक जोनासच्या रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा केला आहे. प्रियांका आणि निक यांच्या लग्नाला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र तरी देखील अजूनही या लग्नाची चर्चा सुरूच असते, अजूनही प्रियांका चोप्राला लग्नावरून ट्रोल केलं जातं. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या रिलेशनशिपबाबत उलट सुटल चर्चा सुरू असतात. यावर प्रतिक्रिया देताना आता प्रियांका चोप्राने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. आमच्या लग्नाला आता आठ वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यामुळे अजूनही जे लोक आमचं नातं उद्ध्वस्त होण्याची वाट पहात आहेत, आमच्या घटस्फोटाची वाट पहात आहेत, तर तो त्यांचा चॉईस आहे, मी त्याबद्दल आता विचार करणं सोडून दिलं आहे, असं यावेळी प्रियांका चोप्राने म्हटलं आहे.

पुढे बोलताना ती असंही म्हणाली की, मला माहिती नाही की आम्ही असं जगाच्या वेगळं काय केलं की? लोक आमच्यावर नाराज झाले आहेत, कदाची आम्ही वेगवेगळ्या धर्माचे आहोत, वेगवेगळ्या देशाचे आहोत, आमच्या वयात अतंर जास्त आहे, म्हणून ट्रोल करण्यात येतंय का? हे खूप दुर्दैवी आहे असं यावेळी प्रियांका चोप्राने म्हटलं आहे. दरम्यान प्रियांका आणि निक सुखाने संसार करत आहेत, नात्यावरून एवंढ ट्रोल होत असताना देखील त्यांचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. याचं सीक्रेट देखील यावेळी प्रियांका चोप्राने सांगितलं आहे, आम्ही आता या सर्व गोष्टींचा विचार करणं सोडून दिल्याचं तिने म्हटलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in