• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आधी 167 कोटींच्या पेंटिंगने चर्चा, पुनावाला यांच्या सुनेकडे आहे तब्बल 126 कोटींची गुलाबी हिऱ्याची अंगठी

April 9, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांचे तब्बल १६७ कोटी रुपयांचे पेंटिंग खरेदी करुन प्रकाश झोतात आलेल्या उद्योजक सायरस पुनावाला हे आणि त्यांचे कुटुंबिय लक्झरीयस लाईफसाठी कायम चर्चेत असतात. सायरस पुनावाला यांची सून आणि अदर पुनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला नेहमीच एक्सपेन्सिव्ह लूक्स आणि लक्झरीमुळे लाईमलाईटमध्ये असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या हातातील हिऱ्याची दुर्लभ अंगठीची खूपच चर्चा झाली. या अंगठीशी संबंधित डिटेल्स आणि फॅक्ट ज्वेलरी एक्सपर्टने शेअर केले होते. या रेअर गुलाबी डायमंड रिंगची किंमत तब्बल १२६ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.

नताशा पुनावाला तिचे स्टेटमेंट फॅशन चॉईस आणि रेअर अपियरेन्ससाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी ब्रिटिश म्युझियममध्ये झालेल्या पिंक बॉल इव्हेंटला हजर राहण्यासाठी गेलेल्या नताशाच्या गॉर्जियस आऊटफिट शिवाय तिच्या रेअर रिंगने लोकांचे लक्ष वेधले गेले. अत्यंत दुर्मिळ आणि महागड्या अशा गुलाबी रंगाच्या हिऱ्याच्या अंगठीचा फोटो नताशा हीने शेअर केला होता. ज्वेलर्स तज्ज्ञांच्या मते अंठडीत जडलेला पिंक एण्ड पर्पल डायमंड १०.३८ कॅरेटचा आहे.अंगठीवर जडवलेल्या या गुलाबी हिऱ्याच्या भोवतीही राऊंड शेपमध्ये हिरे जडवलेले आहेत. या अंगठीला प्रसिद्ध जे.ए.आर ज्वेलरने डिझाईन केले आहे. ज्याच्या बँडमध्ये ब्लॅक प्लॅटिनियम फिनिश आहे.आणि यात १७ हिरे जडवलेले आहेत.

फ्रान्सच्या महाराणीशी संदर्भ –

या अंगठीचे कनेक्शन थेट फ्रान्सशी जोडलेले आहे. खूपच दुर्मिळ असलेली ही गुलाबी हिऱ्याची अंगठी फ्रान्सची शेवटची महाराणी मॅरी एंटोनेट हिच्या जवळ होती. तिच्याकडून ती तिच्या मुलीला मिळाली. आणि अनेक वर्षे फ्रान्सच्या शाही परिवाराकडे ही अंगठी होती. मात्र, साल १९९६ मध्ये झालेल्या लिलावात या अंगठीला विकले गेले. तर २०२५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लिलावात ही अंगठी १३ दशलक्ष डॉलरला विकली गेली. ही बोली तिच्या किंमतीच्या ३ ते ५ दशलक्ष डॉलरहून खूपच जास्त होती.

हिऱ्याची किंमत आणि भारताशी कनेक्शन –

या अंगठीला मॅरे थेरेस डायमंड पिंक रिंग म्हटले जाते. हा हिरा आठव्या शतकातील आहे. हा हिरा भारताची प्रसिद्ध खाण गोलकुंडा येथून काढण्यात आला आहे. त्यामुळे या हिऱ्याची किंमत आता १२६ कोटी रुपये आहे. त्यांची सून नताशा पुनावाला देखील या महागड्या हिऱ्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Devendra Fadnavis | राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
  • बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट
  • काही क्षणातच साफ होईल फ्रिजवरचे चिवट डाग आणि निघून जाईल कुबट वास फक्त ‘या’ एका गोष्टीने करा स्वच्छ
  • इतकं धाडस की भरदिवसा तरुणाने प्रेयसीचा गळा चिरला, क्षणात तरुणीचा मृत्यू; महाराष्ट्र हादरला
  • GT vs DC: आयपीएल स्पर्धेत गुजरातचा अवघ्या एका धावेने विजय, विक्रमासह असा जुळून आला योग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in