• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओरम यांच्या हस्ते आदिवासी कला महोत्सव 2026 चे उद्घाटन

March 2, 2026 by admin Leave a Comment


नवी दिल्ली : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आदिवासी कार्य मंत्रालयाने राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत ट्राइब्स आर्ट फेस्ट (TAF) 2026 चे आयोजन केले आहे. पंतप्रधानांनी याआधी वेळोवेळा अधोरेखित केले आहे की आदिवासी कला, भाषा आणि परंपरा या भारताच्या सजीव सभ्यतागत वारशाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओरम यांनी आज त्रावणकोर पॅलेस येथे 12 दिवसांच्या या महोत्सवाचे उद्घाटन केले आणि आदिवासी वारशाच्या जतनाबरोबरच आदिवासी समुदायांच्या संरचित आर्थिक सक्षमीकरणासाठी भारत सरकारची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.

समारंभाची सुरुवात संगीत नाटक अकादमीच्या सुरेल ‘वंदे मातरम्’ सादरीकरणाने झाली. आदिवासी कार्य मंत्रालयाने Federation of Indian Chambers of Commerce & Industry (FICCI) आणि National Gallery of Modern Art (NGMA) यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या महोत्सवात 30 हून अधिक आदिवासी कला परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे 75 पेक्षा अधिक आदिवासी कलाकार आणि 1000 पेक्षा अधिक कलाकृती सहभागी आहेत. हा भारताच्या आदिवासी दृश्यकलेचा सर्वसमावेशक राष्ट्रीय प्रदर्शक महोत्सवांपैकी एक आहे.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुअल ओराम, आदिवासी कार्य राज्यमंत्री दुर्गादास उईके, आदिवासी कार्य मंत्रालयाच्या सचिव रंजना चोप्रा; अतिरिक्त सचिव मनीष ठाकूर; संयुक्त सचिव अनंत प्रकाश पांडेय, National Gallery of Modern Art चे महासंचालक डॉ. संजीव किशोर गौतम; तसेच FICCI FLO अध्यक्षा आणि आयुर्वेदांत प्रा. लि. संचालिका सुश्री पूनम शर्मा यांचा समावेश होता.

या प्रसंगी अधिकृत TAF कॅटलॉगचे अनावरण करण्यात आले, ज्यामध्ये सहभागी कलाकार, कला परंपरा आणि प्रदर्शित कलाकृतींचे निवडक दस्तावेजीकरण सादर केले आहे. तसेच TAF लाँच व्हिडिओही प्रदर्शित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत शिलाँग, मेघालय येथील Khmih Creative Society यांनी आदिवासी संगीत परंपरांचे प्रभावी सादरीकरण केले.

आपल्या भाषणात जुएल ओरम यांनी सांस्कृतिक जतन आणि सामाजिक-आर्थिक विकास यांचा समन्वय साधणाऱ्या आदिवासी सक्षमीकरणाच्या एकात्मिक दृष्टिकोनावर भर दिला. त्यांनी विशेषतः PVTGs साठी PM JANMAN, DAJGUA, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळांचा विस्तार, तसेच TRIFED मार्फत बाजारपेठीय संलग्नता बळकट करण्यासारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की ट्राइब्स आर्ट फेस्टसारखे उपक्रम केवळ प्रतीकात्मक उत्सव न राहता, कलाकारांना संग्राहक, गॅलऱ्या, कॉर्पोरेट संस्था आणि नागरिकांशी जोडून शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करतात.

राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी म्हटले की, अशा महोत्सवांमुळे आदिवासी समुदायांना त्यांच्या वारशाचे आणि कलात्मक उत्कृष्टतेचे सादरीकरण स्वतःच्या अटींवर करण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ मिळते. सचिव सौ. रंजना चोप्रा यांनी सांगितले की, ट्राइब्स आर्ट फेस्ट धोरणाला प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित करते, ज्यामध्ये समानता, सन्मान आणि शाश्वतता या तत्त्वांवर आधारित आदिवासी कला प्रोत्साहन दिले जाते.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील वारली, मध्य प्रदेशातील गोंड, मध्य प्रदेश–राजस्थान–गुजरातमधील भील, पश्चिम बंगाल–छत्तीसगड–ओडिशातील डोकरा, झारखंडमधील सोहराई, तेलंगणा–आंध्र प्रदेशातील कोया, तमिळनाडूमधील कुरुंबा, ओडिशातील साऊरा, आसाम व ईशान्येतील बोदो, झारखंड–छत्तीसगडमधील ओरांव, राजस्थान–मध्य प्रदेशातील मांडणा, बिहार–मध्य प्रदेश–छत्तीसगडमधील गोडना, ईशान्येतील बांबू हस्तकला आदी विविध परंपरांचा समावेश आहे.

महोत्सवात ‘Tribal Art Revival & Sustainable Futures’, ‘Tribal Art in Contemporary Spaces’ आणि ‘Livelihoods & Market Linkages’ यांसारख्या विषयांवरील परिसंवाद, कार्यशाळा, कथाकथन, प्रात्यक्षिके आणि जिवंत सादरीकरणे आयोजित करण्यात आली आहेत. देशभरातील 100 हून अधिक आदिवासी कला विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शित फेरफटका, वरिष्ठ कलाकारांशी संवाद आणि सर्जनशील प्रक्रियेचा अनुभव दिला जात आहे.

TAF 2026 मधील विशेष आकर्षण म्हणजे ‘प्रोजेक्ट खुम – रूटेड इन क्रिएटिव्हिटी’, ज्याची संकल्पना सुश्री जय मदान यांनी आदिवासी कलाकारांसह मांडली आहे. ‘खुम’ हा कोकबोरोक (त्रिपुरा) भाषेतील ‘फूल’ या अर्थाचा शब्द असून, तो सर्जनशीलतेच्या उमलण्याचे प्रतीक आहे.

3 मार्च 2026 पासून सर्वांसाठी खुले असलेले ट्राइब्स आर्ट फेस्ट 2026 हे पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 या दृष्टीकोनाशी सुसंगत असून, समावेशक वाढ, सांस्कृतिक जतन आणि आदिवासी समुदायांच्या शाश्वत आर्थिक सक्षमीकरणासाठी भारत सरकारची बांधिलकी अधोरेखित करते. मंत्रालय सर्व संबंधित घटकांना या महोत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचे, थेट खरेदीद्वारे आदिवासी कलाकारांना पाठिंबा देण्याचे आणि सांस्कृतिक समता व समृद्धीसाठी योगदान देण्याचे आवाहन करते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in