• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून RISA: Timeless Tribal हा ‘प्रीमियम सिग्नेचर ब्रँड लॉन्च

March 20, 2026 by admin Leave a Comment


नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली येथे 18 मार्च 2026 रोजी सुंदर नर्सरीमध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुअल ओराम यांच्या हस्ते RISA: Timeless Tribal या ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर, आदिवासी व्यवहार सचिव रंजना चोप्रा, संयुक्त सचिव अनंत प्रकाश पांडे, ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक एम. राजामुरुगन आणि प्रसिद्ध डिझायनर मनीष त्रिपाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना मंत्री जुअल ओराम म्हणाले की, ‘आदिवासी हस्तकला कालातीत असली तरी तिचे योग्य मूल्यांकन होत नाही. भारत ट्राइब्स फेस्ट आणि RISA सारखे उपक्रम बाजारपेठेपर्यंत पोहोच आणि न्याय्य नफा वाटप सुनिश्चित करून हा तुटवडा भरून काढत आहेत.’ सावित्री ठाकूर यांनी सांगितले की, ‘सरकार आदिवासी विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे आणि BTF व RISA सारखे उपक्रम ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळ देत आहेत.

सचिव रंजना चोप्रा यांनी म्हटले की, ‘वाढती मागणी असूनही नफा अनेकदा आदिवासी कारागिरांपर्यंत पोहोचत नाही. RISA यामध्ये सुधारणा करून तळागाळापर्यंत न्याय्य नफा पोहोचवेल. ‘RISA’ हे नाव त्रिपुराच्या पारंपरिक हातमागावरील स्टोलवरून प्रेरित असून, ते सांस्कृतिक ओळख आणि दैनंदिन वापराचे प्रतीक आहे.

डिझायनर मनीष त्रिपाठी यांनी सांगितले की, भारतातील डिझाइन ही फक्त स्टुडिओपुरती मर्यादित नसून ती लोकांच्या परंपरांमध्ये जिवंत आहे. RISA हा केवळ ब्रँड नसून कारागिरांसोबतची सहनिर्मिती आहे. TRIFED चे एमडी एम. राजामुरुगन यांनी सर्व भागीदारांचे आभार मानत सांगितले की, ‘RISA हा समुदाय-आधारित उत्पादन आणि समावेशक विकासाचा मजबूत प्रतीक आहे.’

RISA काय आहे ?

RISA हा ब्रँड आदिवासी विणकाम आणि हस्तकला जतन करून त्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या टप्प्यात 10 क्लस्टर्समध्ये 5 विणकाम प्रकार, 2 भरतकाम प्रकार आणि 3 हस्तकला प्रकारांचा समावेश आहे.

प्रमुख उद्दिष्टे

  • डिझाइन : नवीन डिझाइन तयार करून उत्पादन विकास आणि परंपरांचे पुनरुज्जीवन
  • कौशल्य विकास : आदिवासी कारागिरांना उच्च दर्जाच्या उत्पादनासाठी प्रशिक्षण
  • पायाभूत सुविधा : विणकाम क्लस्टर्स आणि शिवण युनिट्सची उभारणी
  • प्रीमियम पॅकेजिंग : NID हरियाणा द्वारे पर्यावरणपूरक पॅकेजिंग विकसित

पार्टनर

या उपक्रमात अबू जानी-संदीप खोसला, मनीष त्रिपाठी, अंजू मोदी, गौरव जय गुप्ता आणि समीरा दलवी यांसारखे प्रसिद्ध डिझायनर सहभागी आहेत.

प्रमुख विणकाम आणि भरतकाम

  • एरी सिल्क – बोदो समुदाय (आसाम)
  • संताल कापूस – संताल (झारखंड)
  • चांगपा पश्मीना – चांगपा (लडाख)
  • कोटपाड कापूस – मिर्गन (ओडिशा)
  • मुगा सिल्क – मिसिंग (आसाम)
  • डोंगरिया भरतकाम – डोंगरिया कोंध (ओडिशा)
  • टोडा भरतकाम – टोडा (तामिळनाडू)

याशिवाय मणिपूरचे लोंगपी मातीभांडे, लडाखचे तुर्तुक ब्रास कटलरी आणि छत्तीसगडची प्रसिद्ध डोकरा कला यांचाही समावेश आहे.

RISA हा उपक्रम भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करताना आदिवासी समुदायांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘विकसित भारत’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेला हा उपक्रम आदिवासी समुदायांना देशाच्या विकासातील महत्त्वाचे घटक बनवतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • येथे भाड्याने मिळते कबर, रेंट नाही भरले तर मृतदेह बाहेर फेकला जातो…
  • इराणकडून भारताला मोठा दणका, होर्मुझमध्ये लावला मोठा ‘टोल टॅक्स’, प्रत्येक जहाजाकडून वसूल करणार इतके कोटी
  • IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
  • Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई
  • Horoscope : 13 एप्रिलचा दिवस खूपच खास, 3 राशींसाठी पैशांचा दुर्मिळ योग; वाचा नशीब कसं फळफळणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in