• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आत राहिलो तर डसतोय, उडी मारली तर जीव जातोय… धावत्या लोकलमध्ये साप शिरताच मोठा थरार; प्रवाशांची वाचाच बसली

January 23, 2026 by admin Leave a Comment


Train Viral Video : अजमेरहून जबलपूरकडे जाणाऱ्या दयोदय एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये रविवारी सायंकाळी घडलेल्या एका विचित्र घटनेने प्रवाशांची तारांबळ उडवली. चालत्या ट्रेनमध्ये अचानक साप आहे… साप आहे… अशा किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या आणि काही क्षणांतच संपूर्ण कोचमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जवळपास दोन तास प्रवासी दहशतीच्या सावटाखाली प्रवास करत राहिले.

नेमकं काय घडलं?

ट्रेनमध्ये हे भीतीचं वातावरण तेव्हा सुरू झालं जेव्हा एका प्रवाशाच्या नजरेस सीटखाली सापासारखी एक गोष्ट दिसली. त्याने ती पाहताच क्षणाचाही विलंब न करता आरडाओरड सुरु केली. पाहता पाहता ही बातमी संपूर्ण एसी कोचमध्ये पसरली. काही प्रवासी घाबरून आपल्या जागा सोडून उभे राहिले तर काही जणांनी लहान मुलांना आणि आपले सामान घेऊन सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. साप नेमका कुठे आहे आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे कुणालाच समजत नव्हतं.

संध्याकाळी सुमारे 7 वाजताच ट्रेनमध्ये साप असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. त्यानंतर प्रशासन तात्काळ अलर्ट मोडवर गेलं. ट्रेन कोटा स्टेशनला पोहोचण्यापूर्वीच स्नेक कॅचर गोविंद शर्मा यांना पाचारण करण्यात आलं. दरम्यान, आरपीएफचे जवान माधोपुर ते कोटा दरम्यान सतत एसी कोचवर लक्ष ठेवून शोध घेत होते.

कोटा स्टेशनवर सखोल तपासणी

रात्री सुमारे 10 वाजता दयोदय एक्सप्रेस कोटा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर दाखल झाली. प्लॅटफॉर्मवर आधीपासूनच स्नेक कॅचर आणि आरपीएफचे जवान उपस्थित होते. ट्रेन थांबताच एसी कोच-1 आणि एसी कोच-2 मध्ये सापाची तपासणी सुरू करण्यात आली. जवळपास 10 मिनिटे सीटखाली, बर्थ, गॅलरी आणि कोचच्या प्रत्येक कोपऱ्यात बारकाईने पाहणी करण्यात आली. मात्र, कोणताही साप आढळून आला नाही.

तपासणीदरम्यान प्रवाशांची चौकशी केली असता या संपूर्ण गोंधळामागचं सत्य समोर आलं आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एका लहान मुलाकडे सुमारे दीड फूट लांबीचा नकली साप होता. प्रवासादरम्यान ते मूल त्या खेळण्याशी खेळत होतं. खेळता-खेळता तो नकली साप त्याच्या हातातून निसटून सीटखाली पडला. त्याच वेळी एका प्रवाशाच्या नजरेस तो पडला आणि त्याने तो खरा साप समजून आरडाओरड केली ज्यामुळे संपूर्ण कोचमध्ये घबराट पसरली.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या मागच्या 9 पर्वात कशी होती टीम इंडियाची कामगिरी, जाणून घ्या एका क्लिकवर
  • IND vs AFG : 4 षटकार-9 चौकार, वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई
  • 8.38 पर्यंत सगळं ठीक, 8.44 ला विमान कोसळलं… अजित दादांसोबत शेवटच्या 6 मिनिटांमध्ये काय झालं?
  • तुमच्या जन्मकुंडलीत शनि देवाची स्थिती कमकुवत असेल तर करा ‘हे’ उपाय
  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील पाच मोठे उलटफेर, दुबळ्या संघांनी बलाढ्य संघांना पाजलं पराभवाचं पाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in