• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता हे सहन करू शकत नाही, युवी तर…, युवराज सिंहच्या बायकोच्या विधानामुळे खळबळ

February 1, 2026 by admin Leave a Comment


Yuvraj Singh Wife Hazel Keech: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता देखील सर्वत्र युवराज सिंह याची चर्चा रंगली आहे. युवराज सध्या बायको हेजल कीच हिच्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये हेजल पती युवीवर रागावताना दिसत आहे. सध्या हेजल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. हेजल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आता हेजल कीच हिने युवीवर रागावताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये हेजल म्हणते, ‘मी जिथे जाते तिथे युवी दिसतो. मागे – पुढे सर्वत्र…. आता तर युवीची सुट्टी…’, सांगायचं झालं तर, हेजल हिने व्हिडीओ विनोदी अंदाजात शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

युवी कायम करत असतो हेजल हिचं कौतुक…

सांगायचं झालं तर, हेजल किच आणि युवराज सिंह यांची लव्हस्टोरी कोणत्या सिनेमापेक्षा कमी नाही. दोघांनी त्यांच्या शोबद्दल विनोदवीर कपिल शर्मा याच्या शोमध्ये सांगितलं होतं. एवढंच नाही तर, युवराज कायम पत्नीचं सर्वांसमोर कौतुक करताना दिसतो. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत युवीनं सांगितलं, पत्नीमुळे माझं माझ्या मुलांसोबत नातं अधिक घट्ट झालं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mamaraazzi (@mamaraazzi)

 

युवराज म्हणालेला, वडील होण्याबद्दल बोलताना युवराजने त्याचे संपूर्ण श्रेय पत्नी, अभिनेत्री हेजल कीचला दिलं. ‘माझ्या मुलांसोबत माझं नातं फार चांगलं आहे आणि याचं श्रेय मी पुर्णपणे हेजल याला देत आहे… मुलांचा जन्म झाल्यानंतर मी त्यांचे डायपर बदलायला आणि दूध पाजायला खूप घाबरायचो. पण तेव्हा मला हेजलने समजावलं, असं केल्यामुळे तुझं मुलांसोबत नातं आणखी घट्ट होईल. आज परिस्थिती अशी आहे की, मी एक महिना तरी मुलांना भेटलो नाही तर, आम्ही रोज बोलत असतो. दूर असलो तर, मला त्यांची खूप आठवण येते आणि त्यांना माझी…’

हेजल सुद्धा कायम करते प्रेम व्यक्त

हेजल सुद्धा युवीवर प्रचंड प्रेम करते, हे तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येतं. नुकताच, हेजल हिने युवीसाठी एक खास पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं होतं. ज्यामध्ये युवी त्याच्या दोन मुलांसोबत दिसला. युवी आणि हेजल यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 30 नोव्हेंबर 2016 मध्ये हेजल आणि युवी यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहे…. तर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुधचे होणार ट्रिपल गोचर! या 3 राशींना बंपर लाभ होणार, भरपूर कमाई करणार
  • Budget 2026 : औषधांच्या किंमतीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची मध्यमवर्गीयांना मोठी भेट
  • Budget 2026 : आता सिगारेट महागली, जाणून घ्या 10 रुपयांची सिगारेट किती रुपयांना मिळणार?
  • Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून…
  • आता हे सहन करू शकत नाही, युवी तर…, युवराज सिंहच्या बायकोच्या विधानामुळे खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in