• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता मुंबईकरांना मिळणार हक्काचं घर, राज्याच्या अर्थसंकल्पात फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026 by admin Leave a Comment


आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबईत 20 लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि 10 लाख परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, त्यासोबतच  वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार . बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करणार . मुंबईतील पर्यटन विकासाला चालना देणार अशा काही घोषणा देखील यावेळी करण्यात आल्या आहेत.

मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या घोषणा 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी मार्गावरील तीन स्थानके फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार. विरार, बोईसर, ठाणे स्थानकाभोवती विकासाचा बृहद आराखडा तयार करणार.
अटल सेतूला जोडून 200 चौरस कि.मी. क्षेत्रात तिसरी मुंबई निर्माण करणार.  कर्नाळा, साई चिरनेर, नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफिल्ड शहरे तयार करणार. वाढवण बंदराच्या माध्यमातून 2 लाखांहून अधिक रोजगाराची निर्मिती, मच्छिमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर, आसपासच्या 44 गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार, मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार अशा महत्त्वाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत.

यासोबतच  मुंबई महानगर प्रदेशात 20 लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार, 10 लाख परवडणारी घरांची निर्मिती करणार, नवीन झोपडपट्टी होणार नाही, यासाठी ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’ प्रणाली विकसीत करणार, अशा घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. तसेच  मुंबईतील भुयारी मारर्गांसंदर्भात देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भरीव तरतूद,  अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करुन लाभाचे व्यवस्थापन आणि गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार. सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणले जाणार.   राज्यात 27 लाख लखपती दिदी झाल्या, 2026-27 मध्ये आणखी 25 लाख लखपती दिदी करणार. महिला बचतगटांच्या वस्तू उत्पादन, विक्रीसाठी 13 जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार अशा घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in