• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता नियम धाब्यावर का? मला लिलावतीला जाऊन सिटी स्कॅन करता येणार नाही म्हटल्याने शो सोडला; ‘बिग बॉस मराठी 1’च्या स्पर्धकाचा सवाल

March 6, 2026 by admin Leave a Comment


बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधील स्पर्धक सुशांत शेलार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शो विषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आताचा सिझन पहिल्या सिझनपेक्षा किती वेगळा आहे, आताचे नियम किती वेगळे आहेत, याविषयी त्याने खुलासा केला. “मी बिग बॉसच्या घरात जाऊन आलोय, त्यामुळे इतर स्पर्धक कसे आहेत, कसे खेळत आहेत हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ का होईना, शो पाहतो. बिग बॉसचं घर बघण्याचा मोह होतो आणि ते घर बघताना त्यातील सदस्य, नमुनेही बघायला मिळतात. पहिला सिझन कसा होता आणि तो किती लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राला माहीत आहे. माझ्या नंतरचे सिझन कसे होते आणि त्याचे रेटिंग काय आहेत, हे मी बोलण्याची गरज नाही,” असं तो म्हणाला.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सुशांत नियमांविषयी पुढे म्हणाला, “मला शोमध्ये नियम दाखवले, सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागतात, तुला लिलावतीला जाऊन सिटी स्कॅन करता येणार नाही, तुला लोणावळा सिटी सोडता येणार नाही.. असे नियम दाखवून मला तो शो सोडावा लागला. त्याच्यानंतर इतर सिझन्समध्ये बरीच लोकं जात होते, येत होते. मग तेव्हा का नियम धाब्यावर बसवले?”

आताच्या सिझनमध्ये तन्वी कोलते चांगला खेळ खेळतेय, असं मत सुशांतने मांडलंय. “या सिझनमध्ये मला असं वाटतं की तन्वी कोलते चांगलं खेळतेय. ती सगळ्यांना सांभाळून घेतेय, सामावून घेतेय, जेवण पण बनवतेय, टास्क पण खेळतेय. ती जिंकेल किंवा टॉप 5 मध्ये तरी जाईल असं मला वाटतंय. रुचिता जामदारला गेम कळला आहे, ज्या जोशने ती खेळतेय ते, कौतुकास्पद आहे. राखी सावंत पूर्ण एंटरटेन्मेंट पॅकेज आहे, ती आली की गोष्टी घडतात आणि मजा येते. मला रोज या सिझनचे एपिसोड्स पाहता येत नाहीत, पण माझी मुलगी नियमित हा शो बघते. तिच्यासोबत मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एपिसोड्स बघतो. पण या सिझनमध्ये मला टास्कच दिसत नाहीयेत, स्पर्धक एकतर पोहे खात असतात, चिप्स खात असतात किंवा भांडत असतात. पहिल्या सिझनमध्ये तर आम्हाला साखर, कॉफी यासाठी भीक मागायला लागायची. पोहे तर दूरची गोष्ट आहे आणि कपडे पण आम्ही हाताने धुवायचो, वॉशिंग मशिन नव्हती. आमच्यावेळी नियम कडक होते. त्यानंतर कदाचित त्यांना स्पर्धक तितके स्ट्राँग मिळाले नसतील, जे कडक नियम पाळू शकतील”, असा टोला त्याने लगावला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दारूसोबत चखना का खातात? कारण ऐकून पिणाऱ्याचीही झटकन उतरेल
  • Ashok Kharat | खरात मुस्लिम असता तर त्याची वरात काढली असती; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
  • मुलींचा गैरफायदा घेणं…! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा
  • एकट्याने बघा हा चित्रपट, प्रचंड बोल्ड सीन, 4 वर्षांपूर्वी करण्यात आला बॅन, अचानक YouTube वर झाला व्हायरल
  • हौसेला मोल नाही ! नीता अंबानींच्या हातातली एवढीशी बॅग, त्या किंमतीत येईल 1 बीएचके फ्लॅट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in