• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता तो फायर होईल..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकलेल्या शुबमन गिलबाबत पुजाराचं मोठं विधान, म्हणाला..

March 21, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार असून जेतेपदाची शर्यत खऱ्या अर्थाने सुरू होईल. या स्पर्धेत गुजरात टायटन्स संघावर दबाव असणार आहे. कारण मागच्या दोन पर्वात हवी तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जेतेपदाचं उराशी बाळगून गुजरात टायटन्स संघ मैदानात उतरणार आहे. पण असं असलं तरी शुबमन गिलच्या कर्णधारपदाचा आणि फलंदाजीचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. कारण शुबमन गिलकडे स्वत:ला सिद्ध करण्याची एक मोठी संधी आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याची बॅट काही चालली नाही. म्हणून त्याला संघातून डावलण्यात आलं होतं. आता 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने संघात जागा मिळवण्याचा त्याचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराने गिलबाबत मोठं विधान केलं आहे. त्याने गिलवर स्तुतीसुमनं उधळताना सांगितलं की, गिलमध्ये तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळण्याची क्षमता आहे. आता आयपीएलमध्ये या फॉर्मेटमध्ये फायर होण्याची इच्छा असेल. म्हणजेच चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

काय म्हणाला चेतेश्वर पुजारा?

चेतेश्वर पुजारा जिओस्टारशी चर्चा करताना म्हणाला की, टी20 वर्ल्डकप संघातून वगळल्यानंतर त्याच्यात आग तेवत असेल. तो उत्साहाने भरलेला असेल. तिन्ही फॉर्मेटमधील एक चांगला खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर नक्की टी20 संघात कमबॅक करेल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याला संघातून वगळल्याने आता तो स्वत:ला सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आयपीएल स्पर्धेकडे मोठी संधी म्हणून पाहिल आणि पुन्हा पुनरागमनाची तयारी करेल. गिलला आता दाखवून द्यायचं आहे की तो 150 चे 160 च्या स्ट्राईक रेटने धावा करू शकतो.

शुबमन गिलचं नेतृत्व

गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात 2022 मध्ये जेतेपद पटकावलं होतं. तर 2023 मध्ये अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिलं होतं. त्यानंतर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे गेला आणि शुबमन गिलकडे नेतृत्व आलं. शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाची कामगिरी हवी तशी झाली नाही. त्यामुळे यंदाच्या पर्वात चांगल्या कामगिरीसह जेतेपद पटकावण्याचा गुजरात टायटन्सचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, शुबमन गिलने आयपीएलच्या 118 सामन्यात 3866 धावा केल्या आहेत. आता त्याला या स्पर्धेत सूर गवसतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in