• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता चायनीज मांजामुळे मृत्यू झाल्यास हत्येचा गुन्हा दाखल होणार, नव्या आदेशाने बसणार चाप

February 6, 2026 by admin Leave a Comment


तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये वाचले असेल कीस चायनीज मांजामुळे अनेकांचा मृत्यू होतो, तर काहीजण गंभीर जखमी होतात. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे आता उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात चायनीज मांज्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला. चायनीज मांजाची विक्री आणि उपलब्धता रोखण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना राज्यभरात सखोल छापे टाकण्याचे निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर आता कारवाई होणार आहे.

उत्तर प्रदेशात मांजावर बंदी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, ‘चायनीज मांजामुळे होणारा कोणताही मृत्यू हा आता खून मानला जाईल आणि त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही पातळीवर निष्काळजीपणा होणार नाही याची खात्री करण्यासाठी या राज्यव्यापी मोहिमेचा नियमितपणे उच्च पातळीवर आढावा घेतला जाईल.’ यातून हे स्पष्ट होते की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चायनीज मांजामुळे होणाऱ्या सततच्या मृत्यूंबद्दल नाराज आहेत. त्यांनी बंदी असूनही हा मांजा बाजारात कसा पोहोचत आहे आणि ते कोण विकत आहे याची चौकशी करण्याचे आणि कारवाईचे आदेश दिले आहेत.

खुनाचा गुन्हा दाखल होणार

मुख्यमंत्री योगी पुढे बोलताना सांगितले की, चायनीज मांजामुळे होणारा कोणताही मृत्यू आता खून मानला जाईल आणि संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे सरकार आता अशा विक्रेत्यांवक कठोर कारवाई करणार असल्याचे समोर आले आहे. बुधवारी लखनौमध्ये एका वैद्यकीय प्रतिनिधीचा चायनीज मांज्यामुळे गळा कापल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आता सरकारने तातडीने पावले उचलली आहेत.

मांजाच्या बेकायदेशीर वापराला चाप बसणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले की, आता संपूर्ण राज्यात या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असूनही मांजाची विक्री केली किंवा वापर केला तर असा सहन केला जाणार नाही.’ आदित्यनाथ यांनी पोलिसांना या बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्या संपूर्ण नेटवर्कची ओळख पटवून, त्वरित कारवाई करण्याचे आणि गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मांज्याच्या बेकायदेशीर वापराला चाप बसणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळी तुम्ही या गोष्टी पाहिल्या तर दिवस जातो खराब, कशी घ्यावी काळजी?
  • Natasa Stankovic : ‘हे सर्व तुला शोभत नाही’ हार्दिक पंड्याची पूर्वपत्नी नताशाचे पाण्यात आग लावणारे फोटोज
  • टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी रियान परागचा पर्याय खुला, 11 चौकार-षटकार मारत ठोकला दावा
  • Vaibhav Suryavanshi : इंग्लंडचा मोठा क्रिकेटर फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहून भारावला, त्याने लिहिलं की…
  • 3300 कोटी बजेट, कमाई 28000 हजार कोटी, 810 दिवसांपासून OTT वर ट्रेंड करतोय हा चित्रपट, 18 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in