• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले

April 10, 2026 by admin Leave a Comment


काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जळगाव जिल्ह्यात या अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला होता. परिणामी अवकाळीच्या भीतीने बाजारात आवक वाढून गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर सरासरी 15 ते 40 रुपयांनी घसरले आहेत. असे असले तरी तीव्र उन्हामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. गृहिणी गल्लीत येणाऱ्या हातगाड्यांवरूनच भाजीपाला खरेदीला पसंती देत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कोणत्या भाजीचे दर किती कमी झाले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंधरवड्यात भावात झालेले बदल

मिरची 60 (आधी 10 रुपये किलो), कांदा 15 (आधी 20), बटाटे 20 (25), भेंडी 40 (60), कारले 40 (60), वांगी 40 (60), कोथिंबीर 40 (60), टोमॅटो 20 (30), चवळी शेंगा 60 (80), फुलकोबी 20 (आधी 40 रुपये किलो) असे दर आहेत. नजीकच्या काळात हेच दर काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे गृहिणींना जरी फायदा होत असला तरी शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे.

बीडमध्ये झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव शिवारातील शेतकरी खंडू माचवे यांनी आपल्या चाळीस गुंठ्यामध्ये झेंडूच्या फुलाची लागवड केली होती. फुलं देखील चांगली आली आहेत, मात्र मार्केटमध्ये दहा ते वीस रुपये किलोने फुलं विकली जात असल्याने खर्चही निघत नाही. मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलन आणि सणांनंतर फुलांची कमी झालेल्या मागणी यामुळे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शेतकऱ्यांची मदतीसाठी सरकारला हाक

शेतकरी माचवे यांनी आपल्या 40 गुंठ्यामध्ये 70 ते 80 हजार रुपये खर्च केला होता, यातून दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा होती, मात्र मार्केटमध्ये फुलांना भाव नसल्यामुळे केलेला खर्च निघत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आता सरकार या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महिलांसाठी आनंदाची बातमी! दरमहा 3000 रुपये मिळणार, अमित शहांची मोठी घोषणा
  • IPL 2026: मला माफ करा…! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे
  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in