• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता कोणत्याही स्किन केअर शिवाय तुमचा चेहरा उजळेल, फक्त या 5 जादुई फळांचा आहारात करा समावेश

March 25, 2026 by admin Leave a Comment


आजकाल प्रत्येकाला नितळ, तेजस्वी आणि नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा हवी असते. यासाठी लोकं महागडी स्किनकेअर प्रोडक्स, क्रीम्स आणि उपचारांचा अवलंब करतात. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर नियमित योग्य आहार घेतला की तुमचे खरे सौंदर्य आतून खुलून येते आणि यात तुमच्या आहाराची मोठी भूमिका असते. अशावेळेस कोणतेही स्किन केअर न करता तुमची त्वचा चमकदार निरोगी दिसेल. तर तुम्हाला ही कोणत्याही प्रोडक्टचा वापर न करता चेहरा चमकदार हवा असेल तर तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा. ज्यामुळे तुमची त्वचा आपोआप निरोगी आणि चमकदार दिसेल. चला आजच्या लेखात आपण या फळांबद्दल जाणून घेऊयात.

संत्र त्वचेसाठी आहे फायदेशीर

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. संत्र्याच्या सेवनाने कोलेजन वाढवण्यास मदत होते, ज्यामुळे तुमची त्वचा घट्ट आणि तरुण दिसते. संत्र्यांमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे नुकसानापासून संरक्षण करतात आणि डाग कमी करण्यास मदत करतात.

पपई खाल्ल्याने चेहऱ्यावर होतात चांगले परिणाम

पपई त्वचेसाठी एक वरदान आहे. त्यात नैसर्गिक एन्झाइम्स असतात जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात. जर तुमच्या त्वचेवर पिगमेंटेशन किंवा डाग असतील तर पपईच्या सेवनाने चेहऱ्यावरील हे डाग हळूहळू फिके करण्यास मदत करू शकते.

त्वचेसाठी ब्लूबेरीचे फायदे

ब्लूबेरीचे हे छोटं फळ वृद्धत्वविरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, जे फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि त्वचेला अकाली वृद्धत्वापासून वाचवतात. ब्लूबेरी खाल्ल्याने तुमची त्वचा अधिक काळ तरुण आणि ताजीतवानी दिसण्यास मदत होऊ शकते.

रोज कलिंगड खाल्ले तर त्वचेचं दिसेल हा फरक

कलिंगड हे उन्हाळी फळ खाल्ल्याने शरीराला फक्त थंडावाच देत नाही, तर त्वचेला आर्द्रताही देते. कलिंगडमधील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचा आतून ओलसर आणि मऊ राहते. ते त्वचेला आराम देते आणि कोरडेपणा कमी करते.

त्वचा चमकदार करण्यास ॲव्होकॅडो फायदेशीर

ॲव्होकॅडोमध्ये आरोग्यदायी फॅट्स असतात जे त्वचेचे पोषण करून त्वचाला आतून मऊ आणि चमकदार बनवतात, तसेच त्यात व्हिटॅमिन ई असते जे त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
  • घर बसल्या पैसे कमावण्याचे सर्वोत्तम पर्याय, तिसरा तर अत्यंत सोयीस्कर
  • लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in