• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता अ‍ॅप न उघडताच करा चॅटिंग, व्हॉट्सअ‍ॅपचे सिक्रेट फिचर कसं करतं काम?

March 6, 2026 by admin Leave a Comment


जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअॅपकडे (WhatsApp) पाहिले जाते. व्हॉट्सअ‍ॅप सतत आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन अपडेट्स आणत असतात. असते. चॅटिंगसोबतच मोफत ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगमुळे हे अ‍ॅप प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.

whatsapp feature (7)

आता व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सची गरज आणि सोय लक्षात घेऊन अलिकडेच एक सिक्रेट फिचर अॅपमध्ये अॅड केले आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅपचे अ‍ॅप न उघडताही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी किंवा मित्रांशी थेट चॅटिंग करू शकता.

whatsapp feature (1)

हे फिचर सध्या प्रामुख्याने अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी उपलब्ध आहे. अनेकदा आपल्याला काही ठराविक लोकांशी वारंवार चॅट करावी लागते. अशावेळी मग आपल्याला दरवेळी अ‍ॅप उघडून नंबर शोधणं कठीण जाते.

whatsapp feature (6)

मग यासाठी आता तुम्ही या सिक्रेट फिचरचा वापर करुन तुम्ही चॅटचा शॉर्टकट थेट तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर तयार करू शकता. यामुळे एका क्लिकवर चॅट विंडो ओपन होईल आणि तुम्हाला सहज चॅट करता येईल.

whatsapp feature (4)

सर्वात आधी तुमच्या फोनमधील WhatsApp ओपन करा. ज्या व्यक्तीच्या चॅटचा शॉर्टकट हवा आहे, त्या चॅटवर Long Press करा. यानंतर आता उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स (Menu) वर क्लिक करा.

whatsapp feature (3)

तिथे तुम्हाला 'Add Chat Shortcut' हा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. त्यानंतर 'Add' किंवा 'OK' वर क्लिक करून कन्फर्म करा. आता त्या व्यक्तीचा चॅट आयकॉन तुमच्या मोबाइलच्या होम स्क्रीनवर दिसेल. इथून तुम्ही अ‍ॅपमध्ये न जाता त्याच्याशी थेट संवाद साधू शकता.

whatsapp feature (5)

दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप हे केवळ भारतातच नाही तर जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप आहे. एकट्या भारतात ५५ कोटींहून अधिक युजर्स हे व्हॉट्सअॅपचे डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. तर जागतिक स्तरावर हा आकडा २.२१ अब्जांच्या पार आहे.

whatsapp new trick 1

व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन फिचर युजर्सचा वेळ वाचवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. विशेषतः ज्या लोकांशी आपण वारंवार संवाद साधतो, त्यांच्यासाठी हा शॉर्टकट अत्यंत सोयीचा असेल, असं बोललं जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in