• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आजूबाजूला टॉक्सिक आहेत लोक? राहा सावध, बिघडू शकतं तुमचं आरोग्य

March 12, 2026 by admin Leave a Comment


घरात, ऑफिसमध्ये किंवा आपल्या आसपास सतत नकारात्मक बोलणारे आणि मानसिक ताण देणारे लोक असतील तर त्याचा परिणाम केवळ मनावरच नाही तर शरीरावरही होऊ शकतो. एका आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की अशा टॉक्सिक लोकांच्या संगतीमुळे माणूस लवकर वृद्ध दिसू शकतो. प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, सतत तणाव आणि नकारात्मक वातावरणात राहिल्यामुळे व्यक्तीच्या जैविक वयावर (Biological Age) परिणाम होतो. म्हणजेच माणूस प्रत्यक्ष वयापेक्षा आधीच वृद्ध दिसू लागतो तसच विविध आजारांचा धोका देखील वाढू शकतो.

असा करण्यात आला रिसर्च

या अभ्यासात शास्त्रज्ञांनी सुमारे 2600 लोकांवर संशोधन केले. या संशोधनात लोकांच्या नातेसंबंधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. सहभागी लोकांना त्यांच्या आसपासच्या लोकांचे वागणे कसे असते याबाबत प्रश्न विचारण्यात आले. या अभ्यासाचा उद्देश नातेसंबंधांचा माणसाच्या शरीरावर आणि मनावर नेमका कसा परिणाम होतो हे समजून घेणे हा होता. संशोधनात असे आढळले की जवळपास 30 टक्के लोकांनी मान्य केले की त्यांच्या आयुष्यात किमान एक तरी असा व्यक्ती आहे जो नेहमी त्यांना मानसिक तणाव देतो आणि नकारात्मक बोलत असतो. संशोधनात अशा लोकांना ‘हॅसलर’ असे संबोधले आहे. असे लोक इतरांच्या आयुष्यात सतत तणाव निर्माण करत असतात.

मानसिक तणावाचा शरीरावर कसा परिणाम होतो?

गाझियाबाद जिल्हा रुग्णालयातील मनोरोग विभागाचे डॉ. ए. के. विश्वकर्मा यांच्या नुसार, जर तुमच्या आसपासची एखादी व्यक्ती सतत मानसिक तणाव देत असेल तर मेंदू वारंवार फाइट किंवा फ्लाइट मोडमध्ये जातो. या अवस्थेत शरीर सतत सावध राहते, जणू काही समोर एखादा धोका आहे. ही स्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास त्याचा शरीरावर खोल परिणाम होऊ शकतो आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते. त्यामुळे केवळ जैविक वय वाढत नाही, तर विविध आजारांचा धोका देखील वाढू शकतो.

जैविक वय कसं वाढतं?

शास्त्रज्ञांनी या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांच्या लाळेचे नमुने घेऊन त्यांच्या डीएनएची तपासणीही केली. या तपासणीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे जैविक वय किती वेगाने वाढत आहे, हे समजते. संशोधनात असे आढळले की ज्यांच्या नातेसंबंधांमध्ये मानसिक तणाव देणारी किमान एक व्यक्ती होती, अशा लोकांमध्ये जैविक वय सुमारे 1.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

आरोग्यावर होऊ शकतात हे परिणाम

1.वारंवार डोकेदुखी होणे

2.झोप न येणे किंवा खूप कमी झोप येणे

3.सतत थकवा जाणवणे

4.चिडचिड वाढणे

5.कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे

6.पोटाशी संबंधित समस्या निर्माण होणे



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in