• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आगळ्यावेगळ्या कथानकाची मालिका; ‘बाई तुझा आशीर्वाद’च्या प्रोमोची चर्चा

March 11, 2026 by admin Leave a Comment


‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनी एक नवा विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. घर चालवणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी आणि घराला पूर्णत्व देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं. ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका ठामपणे सांगते की बाई म्हणजे केवळ घर चालवणारी व्यक्ती नाही, तर ती घराला घर बनवणारी शक्ती आहे.

स्टार प्रवाहच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “घराला घरपण एका बाईमुळे येतं. ती खऱ्या अर्थाने घराचं नंदनवन करते. तिचं अस्तित्व हा तिचा आशीर्वाद असतो. अश्या बाईच्या आशीर्वादाला मुकलेल्या घराला, कुटुंबाला पुन्हा एक बाई कशी जोडते याची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून करणार आहोत. मला खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘वाह, ही काहीतरी नवी कल्पना आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘कथा रंजक असेल असं वाटतंय’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे आणि सुनील तावडे यांच्यासह अक्षता अनिता प्रमोद, अर्णव वॅरिअर, पुष्कर सराड, सतीश तांदळे, राघव वर्तक असे अनेक नवोदित कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती निखिल शेठ आणि विनोद लव्हेकर यांच्या पोतडी या निर्मिती संस्थेने केली असून विनोद लव्हेकरच या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. अमोल पाटील या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी पार पाडणार आहेत. ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही नवी मालिका येत्या 30 मार्चपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in