• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आखाती युद्धाने आता खाद्य तेलाला उकळी, दरवाढीची झळ

March 10, 2026 by admin Leave a Comment


इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केला आहे. त्यानंतर जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली आहे. इराणने शेजारील तेल संपन्न राष्ट्रांवर ड्रोन डागल्याने कतार येथील नैसर्गिक गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. त्यात जगातील ५० टक्के तेल वाहतूक होणारी होर्मुज सामुद्रधुनी इराणने बंद पाडल्यात जमा आहे. त्यामुळे तेलाची वाहतूक ठप्प झाली. या समुद्री मार्गातून इतरही मालवाहू जहाजे पास होत असल्याने त्यांच्या वाहतूकी निर्बंध आले आहेत. त्यामुळे एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ होऊन सिलिंडर टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच आता खाद्य तेलावरही संक्रात येण्याची शक्यता आहे.

इराण आणि अमेरिका- इस्राईल युद्धाने आखाती देशात व्यापार बंद पडला आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून वाहतूक होणारी सर्व जहाजे इराणच्या निशाण्यावर असल्याने या मार्गातील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. या जहाजांना विमा संरक्षण देण्यास कंपन्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे इंधन आणि नैसर्गिक वायूची वाहतूक अडचणीत आली आहे. त्यातच आता खाद्य तेलाच्या दरांवर देखील या घटनेची झळ बसू लागली आहे.

आखाती देशात होत असलेल्या युद्धाचा परिणाम लवकरच खाद्य तेलावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत खाद्य तेलाच्या दरात मोठी भाव वाढ झाली आहे. जवळपास 15 लिटरच्या डब्यामागे आठ दिवसात 100 ते 125 रुपये वाढले असून पुढल्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तेलाचे रोजचे भाव कमी जास्त होत आहेत. मात्र सरकारने काही गाईड लाईन घालून दिल्याने आणि साठेबाजी करणाऱ्यावर ऐस्मा नुसार कारवाई करण्याचा धाक दाखवल्याने भाव स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्याने म्हटले आहे.

परंतू युद्ध परिस्थिती अशीच सुरू राहीली तर परिणाम आणखी वाईट होऊ शकतात असे म्हटले जात आहे. नागपूरातील मार्केटमध्ये सध्या जुना स्टॉक असल्याने भावात फार फरक पडलेला नाही. मात्र, अशीच परिस्थिती राहिली तर फरक जाणवू शकतो असे म्हटले जात आहे.

गेल्या आठ दिवसांत वाढलेले दार –

सोयाबीन तेलाचे दर  – 2300 वरून 2380

शेंगदाणा तेलाचे दर  – 2500 वरून 2650

सन फ्लॉवर तेलाचे दर –  2370 ते 2470

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा
  • SRH vs RR : कॅप्टन इशान किशनचा तडाखा, राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट, हैदराबाद सलग पाचव्या विजयापासून रोखणार?
  • हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video
  • बाईक, सेल्फीस्टिक आणि मोबाईल लोकेशन… सोलो ट्रेकरचा मृत्यू, 300 फूट दरीत कोसळून अंत; त्या डोंगरात नेमकं काय घडलं?
  • तर भारताला सर्वात मोठा फटका, इराणकडून भयंकर संकटाची चाहूल; युद्ध न थांबवल्यास…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in