• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आई पुढच्या जन्मी तरी प्रेम दे…, लाईव्ह येत प्रसिद्ध युट्यूबरचा स्वतः संपवण्याचा प्रयत्न, भयानक व्हिडीओ व्हायरल

March 10, 2026 by admin Leave a Comment


आता सेलिब्रिटींपेक्षा युट्यूबर आणि सोशल मीडियास्टार अधिक चर्चेत असतात. आता देखील एका युट्यूबरच्या खासगी आयुष्यात खळबज माजल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. सध्या ज्या युट्यूबरची चर्चा रंगली आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर, बिग बॉस 18 स्पर्धक अनुराग डोभाल आहे. चाहते त्याला UK07 Rider या नावाने देखील ओळखतात… आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, अनुराग एका कार अपघातात गंभीर जखमी झालेला आहे. युट्यूबरने लाईव्ह येत गाडी डिव्हायडरला ठोकली… ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. पण अनुराग याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता का? याबद्दल माहिती अद्याप समोर आलेली नाही… अनुराग 200 च्या स्पीडने गाडी चालवत होता…

इन्स्टाग्राम लाईव्ह येत अनुराग म्हणाला, ‘आयुष्यात आपली माणसंच राहिली नाहीत, तर फोन तरी कोणाला करू… आई पुढच्या जन्मी तरी प्रेम दे…’, त्यानंतर अनुराग 200 च्या स्पीडने गाडी चालवत असताना, त्याने गाडी डिव्हायडरला ठोकली… अपघातानंतर अनुराग याला जवळच्याा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

Anurag Dobhal (UK07 Rider) came live on Instagram, wherein he could be seen driving his car rashly. Calling it the last ride, Anurag ended the video abruptly, which seemed like a crash. He attempted su!c¡de, however he’s safe, and hospitalized currently. pic.twitter.com/bJoLeDQHd5

— BBTak (@BiggBoss_Tak) March 7, 2026

 

सांगायचं झालं तर, अनुराग डोभाल याचा एका व्लॉक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनुराग याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे… अनुराग याने सांगितल्यानुसार, त्याने स्वतःच्या इच्छेने लग्न केलं. पण अनुराग याच्या कुटुंबियांना नातं मान्य नव्हतं… दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत लग्न केल्यामुळे वाद झाले… वाद इतके टोकाला गेले की, अनुराग याने कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

अनुराग याने केलेल्या आरोपांनंकर भाई कलाम याने देखील सोशल मीडियावर पोस्ट आणि काही स्क्रिनशॉर्ट शेअर करत अनुराग खोटं बोलत असल्याचं सांगितलं आहे…’कोणाला याबद्दल काहीही माहिती नाही, त्यामुळे यामध्ये पडू नका…’ स्क्रिनशॉट शेअर करतम म्हणाला, ‘अनुराग त्याच्या पत्नी मारायचा आणि याच कारणामुळे ती सोडून गेली… तो सध्या जे काही करत आहे, ते फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी करत आहे…’ असं देखील अनुराग याचा भाऊ कलाम म्हणाला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in