• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘आई कुठे काय करते’मधल्या ईशाचा होणारा नवरा कोण? बालकलाकार म्हणून केलं होतं काम

February 4, 2026 by admin Leave a Comment


'आई कुठे काय करते' ही मालिका तुफान गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली होती. या मालिकेत ईशाची भूमिका साकारणारी अपूर्वा गोरे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

अपूर्वाने नुकतंच तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अपूर्वाच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एण्ट्री झाली असून त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट करत तिने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. चाफा आणि तो.. मला खूप आवडतात.. अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

अपूर्वाने तिच्या होणाऱ्या जोडीदारासोबतचे फोटो पोस्ट केले असले तरी त्यात त्याचा चेहरा मात्र नीट दिसत नाही. त्यामुळे तिचा होणारा नवरा आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. अखेर नेटकऱ्यांनीच तिच्या नवऱ्याला ओळखलं आहे.

अपूर्वाच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती 'शाळा' या चित्रपटातील अभिनेता अंशुमन जोशी असल्याची चर्चा आहे. अंशुमनने 'फास्टर फेणे', 'फुंतरू', 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

अपूर्वाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल अनेकांनी तिला शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. अंशुमन हा अभिनेता, लेखक आणि छायाचित्रकारसुद्धा आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in