• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आईच्या पिंडदानाची तयारी करत होता तितक्यात वाजला फोन अन्.. तरुणासोबत घडली चमत्कारिक गोष्ट, वाचून तुम्हीही व्हाल हैराण!

January 14, 2026 by admin Leave a Comment


निसर्गाचा करिष्मा आणि मानवी संवेदनांची अशी एक गोष्ट समोर आलीय जी ऐकून कोणाचेही डोळे पाणावतील. ज्या आईला मृत मानून मुलगा अंत्यसंस्काराची तयारी करत होता, ती अडीच वर्षानंतर अचानक जिवंत होऊन परतली. ही गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी वाटू शकते. आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात वास्तवात हे घडलय. प्रकाशम जिल्ह्यात कोटा गावात राहणाऱ्या वेंकटालक्ष्मी मानसिक दृष्ट्‍या अस्वस्थ होत्या. जवळपास अडीच वर्षांपूर्वी नातेवाईक तिला उपचारासाठी गुंटूरच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथून त्या अचानक बेपत्ता झाल्या. नातेवाईकांनी त्यांचा प्रत्येक ठिकाणी शोध घेतला. पण काही पुरावा हाती लागला नाही. दु:खद गोष्ट ही होती की, पत्नीच्या वियोगामध्ये तीन दिवसात पतीचं निधन झालं. वेळ निघून गेल्यानंतर कुटुंबानेही अपेक्षा सोडून दिल्या.

अडीचवर्षांचा काळ लोटल्यानंतर वेंकटालक्ष्मीचा काही शोध लागला नाही. कुटुंबाने हिंदू रितीरिवाजानुसार त्यांना मृत मानलं. घरात त्यांच्या अंत्यसंस्काराची, पिंडदानाची तयारी सुरु होती. त्याचवेळी अचानक खम्मम अन्नम सेवा आश्रमातून एक फोन आला. फोन करणाऱ्याने जे सांगितलं, ते ऐकून कुटुंबियांना विश्वासच बसला नाही. समोरच माणूस फोनवरुन सांगत होता की, तुमची आई जिवंत आहे आणि आमच्याकडे सुरक्षित आहे.

दु:ख अश्रुंच्या माध्यमातून बाहेर आलं

खम्मम पोलिसांना जुलै 2023 मध्ये वेंकटालक्ष्मी रस्त्यावर फिरताना सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांना सेवा आश्रमात भरती करण्यात आलं. आश्रमाचे संचालक अन्नम श्रीनिवास राव यांनी सांगितलं की, दीर्घ उपचार आणि देखभाल केल्यानंतर आईची मानसिक स्थिती सुधारली. प्रकृती सुधारताच त्यांनी गाव आणि मुलगा गुरवैया यांच्याबद्दल माहिती दिली. मुलगा गुरवैया आश्रमात पोहोचला. आई जिवंत असल्याच पाहून त्याचे डोळे पाणावले. अडीच वर्षांचं दु:ख अश्रुंच्या माध्यमातून बाहेर आलं. आश्रमाच्या आयोजकांनी कुटुंबाला सन्मानित करुन वेंकटालक्ष्मी यांना मुलाकडे सोपवलं.

सेवा आणि समर्पण कधीच व्यर्थ जात नाही

ही घटना आपल्याला शिकवते की, सेवा आणि समर्पण कधीच व्यर्थ जात नाही. अन्नम सेवा आश्रम सारख्या संस्थेमुळे आज एक मुलगा आपल्या आईला भेटला. घरात पुन्हा आनंद परतला. जे घर काल दु:खामध्ये बुडालेलं, तिथे आज आनंद, उत्सवाचा माहौल आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Suryavanshi: जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दोन खतरनाक षटकार! मग काय केला विचार? वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने सर्वच गारेगार
  • Harshwardhan Sapkal On Baramati Election | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
  • 6 मिनिट 9 सेकंदांचं ते मस्तमौला गाणं… जे 37 वर्षांनंतरही लोकांना नाचायला भाग पाडतय,धुरंधरमध्येही वाजलं
  • चीन की पाकिस्तान, भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? C-Voter सर्वेक्षणात जनतेनेच सांगितलं खरा धोका कोणापासून?
  • Instant की Filter कोणती कॉफी आरोग्यासाठी सर्वोत्त्म?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in