• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..’ भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल धक्कादायक वक्तव्य VIDEO

April 11, 2026 by admin Leave a Comment


मुखी विठ्ठलाचं नाव आणि पंढरपूर भेटीची ओढ ही वारकऱ्याची खरी ओळख. पण मागच्या काही वर्षांपासून या वारकरी संप्रदायावरुन राजकारण सुरु झालं आहे. भोळाभाबडा भक्तीसंप्रदाय वारकऱ्यांमध्ये कट्टरता पसरवण्याचं काम काही वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सातत्याने करत आहेत. आता शरद पवार यांनी सुद्धा अशाच प्रकारची भूमिका मांडली आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं मोठे वक्तव्य पवारांनी केलं. आता आम्ही अशा धर्मांध लोकांची, प्रतिगामी लोकांची यादी तयार करायला सुरुवात केल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

त्यावर आता भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. त्यांनी शरद पवारांना चक्का मौलाना ठरवलं आहे. “शरद पवार यांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटतो. त्यांनी शरद पवार यांचा मौलाना” असा उल्लेख केला. “वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोंडण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे” असा आरोप तुषार भोसले यांनी केला.

‘तो तुमचं षडयंत्र शिजू देणार नाही’

“अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या झोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही. पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजित समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलाय. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थान केली आणि आता 40-50 लोकांनी टोळी त्याच्यासाठी तयार केलीय. पण एक लक्षात ठेवा हा तुषार भोसले जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत तो तुमचं षडयंत्र शिजू देणार नाही” असं तुषार भोसले म्हणाले.

मौलाना शरद पवारांनी आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थाने केली आणि आता ४०-५० लोकांची टोळी त्यासाठी त्यांनी तयार केली आहे. पण लक्षात ठेवा @PawarSpeaks , मी जिवंत आहे तोवर तुमचं हे षडयंत्र मी शिजू देणार नाही.
ज्यांच्यासोबत इफ्तार पार्ट्या झोडतात ते… pic.twitter.com/pE0JxCqV8J

— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) April 11, 2026

सौदामिनी स्मरणिकेतील लेख

दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन सुरू आहे. या साहित्या संमेलनात सौदामिनी नावाची स्मरणिका तयार करण्यात आली आहे. त्या स्मरणिकेत महिलांचे सक्षमीकरण हेच माझं स्वप्न अशा आशयाचा लेख शरद पवार यांनी लिहिला आहे. याच लेखात शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने भाष्य केले आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लिंगपिसाट खरातचा एपस्टिन होणार? करुणा मुंडे यांच्या विधानाने खळबळ; काय केली मागणी?
  • Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की…
  • टोयोटाचा धमाका! अवघ्या 40 महिन्यांत विकल्या गेल्या 2 लाख गाड्या, ‘या’ 7 सीटर कारने उडवली झोप, किंमत फक्त..
  • छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…
  • बोल्ड सीन असणारे 5 चित्रपट, ज्यामध्ये अभिनेत्रींनी पार केल्या सर्व मर्यादा, आता OTT वर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in