• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अशोक खरात प्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीस… संजय राऊत यांची प्रतिक्रिया

April 12, 2026 by admin Leave a Comment


नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास आता एका वेगळ्याच वळणावर आला आहे. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धेचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती अशोक खरातचे काही महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टीका केली. अशोक खरातचे प्रकरण साध नाही. त्याला राजकीय अँगल आहे. खरातच्या चौकशीमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जसं की कोण किती मिनिटं बोललं, कोणाशी बोललं, ही माहिती गोपनीय असते. पण ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या मदतीने ती बाहेर आली. कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची आहे. खरातशी कोणते नेते कधी, किती मिनिटं, किती वेळा बोलले. ही अत्यंत गोपनीय माहिती आहे. ही माहिती कोणाच्या व्हॉटसअॅपवर सहज येत नाही. मी इतके वर्ष खासदार आहे. पण मला सीडीआर मिळणार नाही. मला कोणी देणार नाही, ज्याच्या हातात सूत्र आहेत. ते गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री यांच्या मदतीशिवाय तुम्हाला सीडीआर मिळू शकत नाही.

त्यामुळे रोहित पवार जे म्हणतात ते खरं आहे खरातच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघड केल्या जात आहेत. अशोक खरातचे पायाशी बसून फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री जे काही उपद्व्याप करत होते. त्याची माहिती समोर आली की आपोआप सर्वांचे बळी जातील. देवेंद्र फडणवीस यांचा बळी घेणं हा छंद आहे. फडणवीसांना अशा शिकारीचा नाद आहे. अशोक खरात फाशीवर जाईल, त्याला जन्मठेप होईल या सर्व गोष्टी सोडून द्या. खरात फाईल्समधून ज्या गोष्टी येणार आहेत, ज्या कागदावर आहेत, जे अत्यंत गोपनीय आहे, ते समोर आल्यानंतर जे वादळ येईल ते महत्त्वाचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik IT Company | मोठी बातमी! नाशिकमध्ये महिलांचे गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्या डेटाने खळबळ
  • Asha Bhosle : आशा भोसले यांचं निधन कशामुळे? डॉक्टरांनी सांगितलं कारण
  • आदित्य ठाकरे यांची निष्ठा तपासणार का? कंम्बोज भेटीवरून शिंदे गोटातून धडाडली तोफ, जिव्हारी लागणाऱ्या प्रश्नाला उद्धव सेना उत्तर देणार?
  • संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला देत म्हणाले…
  • Asha Bhosale: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in