• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अशोक खरातच्या भेटीच्या दाव्यावर नीलम गोऱ्हे यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या मी कधीही…

March 30, 2026 by admin Leave a Comment


सध्या अशोक खरात प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे. अशोक खरात याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीमधून त्याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान 29 मार्चला त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, त्याला न्यायालयानं पुन्हा एकदा एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज एसआयटीकडून त्याच्या कार्यालयाची झाडाझडती देखील घेण्यात आली. अशोक खरात याच्यावर आतापर्यंत दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये आठ गुन्हे हे लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत. तर दोन गुन्हे हे आर्थिक फसवणुकीसंदर्भात आहेत.

दरम्यान या अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नीलम गोऱ्हे या अशोक खरातला अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. एवढंच नाही तर अशोक खरात याने नीलम गोऱ्हे यांचं भविष्य देखील सांगितलं होतं. तसेच आमदारकीसाठी देखील गोऱ्हे या खरातला भेटल्या होत्या, मंत्रिपद मिळावं याकरता भविष्य पहाण्यासाठी गोऱ्हे यांनी खरातची भेट घेतली होती, असा आरोप देसाई यांनी केला आहे.

तृप्ती देसाई यांच्या या आरोपांनंतर आता नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन देसाई यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी अशोक खरातची भेट घेतल्याच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  अशोक खरात याला मी कधीही भेटले नाही, असंही गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.  मी कोणत्याही भोंदूला भेटले नाही, तसे माझ्यावर संस्कार नाहीत.  पुणे महापालिकेत यश न मिळाल्याने काही असंतुष्ट घटक माझ्याविरोधात कारस्थान करत आहेत, असंही यावेळी गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.  नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन तृप्ती देसाई यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी देसाई यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in