• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अशोक खरातचे काही खरे नाही! राहत्या घरावर थेट… नेमकं काय झालं?

April 13, 2026 by admin Leave a Comment


लोकांची फसवणुक करणे, महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपये उकळल्याच्या आरोपांखाली नाशिकमधील अशोक खरातला अटक करण्यात आली. अशोक खरात विरोधात जवळपास 15 तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या त्याची SIT चौकशी सुरु आहे. तपासादरम्यान दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. थेट आयकर विभागाने खरातच्या घरावर धाड टाकली आहे.

आज, नाशिकमध्ये एकाचवेळी ११ ठिकाणी ईडीने केलेल्या छापेमारीने हे स्पष्ट झाले आहे की, हे प्रकरण केवळ एका ‘बाबा’पुरता मर्यादित नाही, तर यामागे एक मोठे नेटवर्क असू शकते.
सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे, चौकशीदरम्यान अशोक खरात वारंवार फिरवाफिरवीची आणि विचित्र उत्तर देत तपास यंत्रणांना उकसवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, तो सत्य लपवत आहे की खरोखरच यामागे काही मोठे राज दडलेले आहे?

ईडीच्या कारवाईने प्रकरण आर्थिक गुन्ह्याच्या कक्षेत

ईडीच्या या कारवाईने प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. खरातचे घर, ऑफिस, फार्महाउस आणि ईशान्यश्वर मंदिर या सर्व ठिकाणी छापे टाकण्यात आले. तपास यंत्रणांना आशा आहे की, येथून महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे मिळतील. ही छापेमारी सूचित करते की, प्रकरण आता मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे वळत आहे आणि पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

सध्या अशोक खरातची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची खरात योग्य पद्धतीने माहिती देत नसल्याचे चित्र आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. ती कुठे आहे असा प्रश्न विचारला असता, खरातने “ते देवालाच माहीत” असे म्हणत हात झटकले. मात्र, आपल्या लाडक्या मुलगा हर्षवर्धनसाठी तो अतिशय व्याकुळ झाला आहे. “माझ्या मुलाची मला खूप काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा तरी फोनवर बोलू द्या,” अशी विनंती तो पोलिसांकडे सतत करत आहे.

दरम्यान, भोंदू अशोक खरातला आज (१३ एप्रिल) पुन्हा नाशिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला कोर्टात आणले जाईल. तिसऱ्या गुन्ह्यात त्याला कोठडी देण्यात आली होती, तर चौथ्या गुन्ह्यात पुन्हा कोठडी मिळवण्यासाठी SIT प्रयत्न करणार आहे. सध्या SIT कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाचा तपशील तपास यंत्रणा आज कोर्टात सादर करणार आहे. अशोक खरातला आज ऑनलाइन पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle | स्वरसाम्राज्ञीला अखेरचा निरोप! आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार…
  • MI vs RCB : सलग 3 पराभवानंतर कॅप्टन हार्दिकचा संताप, चौथ्या सामन्याआधी स्पष्ट संकेत, कुणाचा पत्ता कट होणार?
  • रोहित शर्माची दुखापत किती गंभीर? रुग्णालयात जाण्याची वेळ आल्याने मुंबईचं टेन्शन वाढलं!
  • तीन पिढ्यांचा विश्वास, 7.99 लाखांत मिळतेय ‘असली’ SUV, भारतीयांची पहिली पसंती
  • रात्रभर उभी असूनही तुमच्या EV ची बॅटरी कमी होतेय? ‘हे’ त्यामागचे मुख्य कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in