• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अशोक खरातचे अश्लील VIDEO मोबाईलमध्ये आहेत? पटकन डिलिट करा, पोलीस ॲक्शनमोडमध्ये

March 26, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाशिकमधील अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या स्वयंघोषित ज्योतिषाने अनेक महिलांवर, अल्पवयीन मुलीवर, गर्भवती महिलेवर देखील लैंगिक अत्याचार केले. खरातने त्याच्या कार्यालयात महिलांसोबत जे किळसवाणे कृत्य केले त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आता या विरोधात लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणातील पीडित महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आहेत. जर तुमच्या मोबाईलमध्ये ते व्हिडीओ असतील तर लवकर डिलिट करा.

कोपरगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव येथील दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२), २९४ (३) (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ (अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

घटनेची पार्श्वभूमी

अशोक खरात प्रकरणात नाशिक पोलिसांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त केले आहेत. या प्रकरणात आरोपी खरातला अटक करण्यात आली असून, तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने पीडितांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे लक्षात आले.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दोघा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिस प्रशासनाचा कडक इशारा

अहिल्यानगर जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, अशोक खरात प्रकरणातील कोणत्याही पीडित महिलांचे फोटो, व्हिडीओ किंवा त्यांची ओळख उघड करणारा कोणताही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये. असे काही केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, पीडितांच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कंटेंटला शेअर किंवा फॉरवर्ड करू नये.

हा गुन्हा दाखल होणे हे अशोक खरात प्रकरणातील पीडितांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पोलिसांनी सायबर क्राईम आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कंटेंटवर कडक नजर ठेवली असल्याचे सांगितले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं
  • IPL होऊ दे, मग घेऊन जा रे भावा, वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचे पक्का प्रॉमिस; Viral Video पाहून हसू नाही आवरणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in