• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अशा खालच्या पातळीच्या.. क्रिती सनॉनसोबत ‘कोल्ड वॉर’च्या चर्चांवर भडकून यामी गौतम स्पष्टच म्हणाली..

March 6, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री यामी गौतम आणि क्रिती सनॉन यांच्या इन्स्टाग्रामवरील एका रीलवर केलेल्या लाइकवरून सध्या ‘कोल्ड वॉर’ (शीतयुद्ध) सुरू आहे. क्रितीच्या यशाने यामीला आनंद झाला नाही का, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर यामीने पोस्ट लिहित तिची बाजू स्पष्ट केली आहे. या प्रकरणाची सुरुवात एका इन्स्टाग्राम रीलने झाली होती. या रीलमध्ये एका बाजूला क्रिती सनॉनला तिच्या ‘तेरे इश्क में’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेला झी सिने पुरस्कार हातात घेऊन आनंद व्यक्त करताना दिसतेय. तर दुसरीकडे यामी गौतमच्या जुन्या मुलाखतीतील वाक्य लिहिलेलं पहायला मिळतंय. या रीलमध्ये दोघींच्या ‘तेरे इश्क में’ आणि ‘हक’ या चित्रपटांची तुलना करण्यात आली होती आणि क्रितीला मिळालेल्या पुरस्कारावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. जेव्हा चाहत्यांनी पाहिलं की यामी गौतमने स्वत: या रीलला लाइक केलंय, तेव्हा मात्र त्यावर कमेंट्सचा वर्षावच झाला.

काहींनी याला यामी गौतमचा मोठेपणा असं म्हटलं, तर काहींनी क्रितीविरोधातील ‘पीआर स्टंट’ असल्याची टीका केली होती. हा वाद वाढत असलेला पाहून अखेर यामीने तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित तो लाइक चुकून केल्याचं स्पष्ट केलं.

यामी गौतमची पोस्ट

‘ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली आहे की मी इन्स्टाग्रामवरील एक रील लाइक केली, ज्यामध्ये दुसऱ्या अभिनेत्रीचा तिरस्कार करण्यात आला आहे. आम्हाला दररोज असंख्य गोष्टींमध्ये टॅग केलं जातं आणि त्या पुरस्कार सोहळ्याचा संदर्भ असलेल्या रीलमध्येही मला इतर गोष्टींप्रमाणेच टॅग करण्यात आलं होतं. हे खरं नाहीये आणि अर्थातच ते जाणीवपूर्वक केलं गेलं नाही. जरी काही असेल तरी ते चुकून क्लिक केलं गेलं असेल. माझ्या आयुष्यात मी कधीही खालच्या पातळीच्या पीआरच्या (जनसंपर्क) युक्त्या वापरल्या नाहीत. मी नेहमीच माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे आणि पुढे जात आहे’, असं तिने स्पष्ट केलं.

It has come to my notice that I apparently ‘liked’ a reel that is condescending toward another actor. We get tagged in multiple things every day, and this appeared during an award-function reference like any other tag. It isn’t true and was definitely not done consciously, if…

— Yami Gautam Dhar (@yamigautam) March 5, 2026

या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलंय, ‘सध्याच्या क्लिकबेटच्या विश्वात प्रतिष्ठित सोशल मीडिया पोर्टल्सनाही अशा गोष्टींचा फायदा घेऊन ते कॉफी टेबल गॉसिपमध्ये बदलण्याचा मोह आवरत नाही. पण मला आशा आहे की मी त्यापेक्षा अधिक चांगली प्रतिष्ठा मिळवली आहे, याचा ते विचार करतील. माझी कोणतीही पीआर टीम नाही आणि एंटरटेन्मेंट पुरस्कार सोहळ्यांविषयीचं माझं मत मी अत्यंत आदरपूर्वक खूप आधीच मांडलेलं आहे. माझं लक्ष फक्त माझ्या कामावर आहे.’

The reel Yami is referring to – pic.twitter.com/phE5GTvjUp

— Pan India Review (@PanIndiaReview) March 5, 2026

या वादादरम्यान यामीने ‘द हॉलिवूड रिपोर्टर’ला दिलेली जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने पुरस्कार सोहळ्यांविषयीचं तिचं बेधडक मत मांडलं होतं. “मी आता वॅलिडेशन मागणं सोडून दिलंय. मला पुरस्कार मिळाला म्हणून मी चांगली अभिनेत्री आणि नाही मिळाला तर मी चांगली नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. फिल्म इंडस्ट्रीत गोष्टी इतक्या सरळसोप्या नसतात”, असं ती म्हणाली होती.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in