• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अर्ध्या रात्रीही यॉर्कर टाकू शकतोस! सिराजने असं म्हणताच बुमराहने दिलं मन जिंकणारं असं उत्तर

March 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय संघ जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारताने हा सामना जिंकताच सलग जेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरेल. असं असताना या सामन्यात टीम इंडियासाठी काही खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यात जसप्रीत बुमराहचं नाव आघाडीवर आहे. खरं तर जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचा कणा आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करणं म्हणजे कठीण आहे. जसप्रीत बुमराहचे  षटकं विरोधी संघांना कायम डोकेदुखी ठरतात. त्यामुळेच जसप्रीत बुमराहचा जगभरात डंका आहे. असं असूनही जसप्रीत आजही 16 वर्षांच्या अकादमीतील मुलासारखा सराव करतो. त्यामुळे त्याच्या यशात सातत्य आहे आणि जगभरातील दिग्गज फलंदाज त्याचा सामना करताना घाबरतात.

अहमदाबादमध्ये सुपर 8 च्या टप्पा सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये सराव करत होता. त्याने क्रीजजवर दोन बूट ठेवले होते आणि त्यांना लक्ष करून 45 मिनिटं यॉर्करचा सराव करत होता. मोहम्मद सिराजने हा सराव पाहिला आणि बुमराहला मिश्किलपणे म्हणाला की, ‘भावा, तुला यॉर्करचा सराव करण्याची काय गरज? तू अर्ध्या रात्रीही झोपेतून उठून परफेक्ट यॉर्कर टाकू शकतोस.’ सिराजने असं सांगितल्यानंतर बुमराह हसला आणि पुढचा चेंडू यॉर्कर टाकत बूट उडवलं. त्यानंतर बुमराहा म्हणाला की, याची खूप गरज आहे मित्रा…

जसप्रीत बुमराह आता 32 वर्षांचा आहे. गेल्या काही वर्षात दुखापतीने त्रस्तही झाला. शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यातून सावरून पुन्हा एकदा मैदानात परतला आहे. त्याच्या गोलंदाजीत कोणतीच उणीव दिसत नाही. उलट बुमराह आणखी घातक दिसत आहे. वर्ल्डकपच्या सुरूवातीच्या टप्प्यात सराव सुरू असताना इशान किशनच्या पायाच्या बोटावर चेंडू जोरात लागला होता. त्यामुळे त्याला सराव अर्धवट सोडावा लागला होता. यावरून बुमराहच्या यॉर्करची ताकद दिसून येते. आता बुमराहने अंतिम सामन्यात अशीच कामगिरी करावी आणि संघाला जेतेपद मिळवून द्यावं अशी तमाम क्रीडाप्रेमींची इच्छा आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in