• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात शाही थाट, चांदीच्या थाळीमध्ये पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था

March 9, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे लग्न दोन दिवसांपूर्वी पार पडले. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अर्जुन आणि सानिया चंडोक यांच्या लग्नातील फोटोंमध्ये हे लग्न किती शाही होते याची कल्पना येते. अशातच आता या लग्नातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यातून पाहुण्यांसाठी केलेल्या शाही पाहुणचाराची झलक समोर आली आहे. विशेष म्हणजे अर्जुनच्या लग्नात पाहुण्यांना चक्क चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण वाढण्यात आले होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अर्जुनच्या मित्रांची धमाल

सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अर्जुन पत्नी सानिया चंडोकचा हात धरून मित्रांसोबत एंट्री करताना दिसत आहे. यावेळी मित्र अर्जुनची चेष्टा करताना दिसत आहेत. हसत-खेळत आणि टाळ्यांच्या गजरात या दोघांची एन्ट्री होते. आसपास बसलेले पाहुणेही हा क्षण आनंदाने एन्जॉय करताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या समोर ठेवलेल्या चांदीच्या भांड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण

व्हिडिओमध्ये लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांच्या जेवणासाठी सजवलेले टेबल दिसत आहेत. टेबलवर जेवण वाढण्यासाठी चांदीच्या ताट्या आणि वाट्या मांडलेल्या दिसतात. या चमचमीत भांड्यांमध्ये पाहुण्यांना जेवण देण्यात आले. यामुळे या लग्नातील भव्यता आणि खास व्यवस्था स्पष्ट दिसून येते. सोशल मीडियावर लोक या शाही लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चा करत आहेत.

सेंट रेगिसमध्ये पार पडले लग्न

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचे लग्न मुंबईतील द सेंट रेगिस हॉटेलमध्ये पार पडले. हे एक 5-स्टार लक्झरी हॉटेल असून त्याच्या उत्कृष्ट सुविधा आणि उच्च दर्जाच्या सेवांसाठी ओळखले जातो. येथे एकूण 395 खोल्या आणि 27 लक्झरी सूट्स आहेत. या हॉटेलमध्ये 24 तास खुली जिम, स्पा, आउटडोअर इन्फिनिटी स्विमिंग पूल आणि अनेक उत्कृष्ट रेस्टॉरंट्सची सुविधा आहे. या हॉटेलमध्ये खास बटलर सर्व्हिस मिळते. यात प्रत्येक पाहुण्यासाठी एक अटेंडंट असतो, जो त्यांच्या मुक्कामादरम्यान त्यांच्या सर्व गरजांची काळजी घेतो.

अर्जुनच्या लग्नाला दिग्गजांची उपस्थिती

अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील अनेक खास पाहुने उपस्थित होते. यात महेंद्र सिंग धोनी, युवराज सिंग, सुरेश रैना, जहीर खान, राहुल द्रविड, हरभजन सिंग यांच्यासह अनेक क्रिकेटपटू हजर होते. तसेच बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आशा भोसले यांच्यासोबतच उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी हेही उपस्थित होते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in