• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अरे देवा, अख्खं जग डोकं आपटेल अशी चोरी, रशियन हॉस्टेलजवळ नेमकं काय घडलं?

January 23, 2026 by admin Leave a Comment


Crime News: छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात चोरीची एक धक्कादायक आणि अभूतपूर्व घटना समोर आली आहे. जी ऐकून पोलीस प्रशासनासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरबा येथील रशियन वसतिगृहजवळील कालव्यावर उभारलेला तब्बल 60 फूट लांब आणि सुमारे 30 टन वजनाचा लोखंडी पूल चोरट्यांनी एका रात्रीत पूर्णपणे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

हा पूल सुमारे 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि स्थानिक नागरिकांच्या रोजच्या ये-जा करण्यासाठी याचा वापर केला जात होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी 2026 च्या रात्री ही मोठी चोरी झाली आणि त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कशी केली पुलाची चोरी?

हा पूल चोरण्यासाठी चोरट्यांनी पूर्ण तयारी केली होती. ते गॅस कटर मशीन, ऑक्सिजन सिलेंडर आणि एलपीजी सिलेंडर घेऊन घटनास्थळी पोहोचले होते. संपूर्ण रात्र मेहनत घेत त्यांनी पुलाचे लोखंडी रेलिंग आणि संपूर्ण संरचना तुकड्या-तुकड्यांमध्ये कापले आणि हे लोखंड वाहतुकीच्या वाहनांमध्ये भरून चोरटे घटनास्थळावरून फरार झाले.

सकाळ झाली तेव्हा स्थानिक नागरिकांनी पूलच गायब झाल्याचे पाहिले. तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

पोलीसांकडून विशेष तपास पथक

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोरबा पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक आणि सायबर सेल यांना तपासात सहभागी करण्यात आले. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी या चोरीमागील टोळीचा पर्दाफाश केला.

तपासादरम्यान एकूण 15 आरोपींची ओळख पटवण्यात आली, त्यापैकी 5 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत. लोचन केवट (वय 20 वर्षे). जयसिंह राजपूत (वय 23 वर्षे). मोती प्रजापती (वय 27 वर्षे). सुमित साहू (वय 19 वर्षे). केशवपुरी गोस्वामी उर्फ पिच्चर (वय 22 वर्षे). मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुमारे 5 टन कापलेला लोखंडी माल जप्त केला आहे.

याशिवाय चोरीसाठी वापरलेला छोटा हत्ती, 1 स्प्लेंडर मोटारसायकल, गॅस कटर मशीन, ऑक्सिजन व एलपीजी सिलेंडर, मोबाईल फोन तसेच 6,000 रुपये रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. सध्या पोलिसांचे पथक उर्वरित 10 फरार आरोपींच्या शोधात असून, त्यांनाही लवकरच अटक केली जाईल असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का, मित्र देशानेच केली मोठी पोलखोल, थेट पाकची…
  • कुटुंबाच्या जबाबदारीमुळे 12 व्या वर्षी केला डान्स, एका रात्रीत बनली स्टार, आज संपूर्ण बॉलिवूड तिच्या गाण्यावर थिरकतो, ओळखलं का?
  • मोमोज हवे तर सोनं आणं… मुलाने घरातून चोरले तब्बल 86 लाखांचे दागिने
  • घड्याळात ’11:11′ वाजताच मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? काय आहे गुपित?
  • Sanjay Raut : विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in