• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेने हल्ला केला तर संपूर्ण… खामेनींचा आतापर्यंतचा सर्वात गंभीर इशारा, ट्रम्प यांची झोप उडाली

February 2, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे, डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला रविवारी गंभीर इशारा दिला आहे. इराणवर अमेरिकेने कोणताही लष्करी हल्ला केला तर मध्य पूर्वेत प्रादेशिक युद्ध सुरू करेल, यामुळे संपूर्ण प्रदेशात व्यापक संघर्ष पसरेल अलं खामेनी यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ल्याची धमकी दिल्यानंतर इराणने हे विधान केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

खामेनींचा अमेरिकेला गंभीर इशारा

इराणी सरकारी टेलिव्हिजनने खामेनींच्या हवाल्याने म्हटले की, ‘अमेरिकन लोकांना हे माहित असले पाहिजे की, जर त्यांनी युद्ध सुरू केले तर यावेळी ते प्रादेशिक युद्ध असेल. आम्ही चिथावणीखोर नाही आणि आम्हाला कोणत्याही देशावर हल्ला करायचा नाही. परंतु जो कोणी हल्ला करेल किंवा त्रास देईल त्याला इराणी राष्ट्र योग्य उत्तर देईल.’ आता खामेनी यांच्या या विधानामुळे मध्यपूर्वेत संघर्ष पेटू शकतो, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी इराणमध्ये आंदोलन झाले होते, यावर बोलताना खामेनी यांनी या आंदोलनाची तुलना देशाच्या धार्मिक व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या बंदसोबत केली. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे या आंदोलकांना मृत्युदंडाची शिक्षाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांना सामूहिक फाशी दिली जाण्याचीही शक्यता आहे.

अमेरिका हल्ला करण्याच्या तयारीत

डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेची विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन आणि त्याच्यासोबत असलेल्या अमेरिकन युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. इराणवरील दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र अमेरिका हल्ला करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इराणकडूनही सरावाला सुरुवात

अमेरिकेच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेता इराणनेही होर्मुझच्या धोरणात्मक सामुद्रधुनीत लष्करी सरावांची योजना आखली आहे. हे ठिकाण पर्शियन आखाताचा महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणावरून जगातील तेलाचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. त्यामुळे आता हे दोन्ही देश आता युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दिवसा होणार काळाकुट्ट अंधार, 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी जाणून घ्या, थेट भारतात..
  • सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद, पण रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात?, सामनाचा मोठा दावा काय?
  • मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी मास्टर खेळी, आकडे बदलले, नेमकं काय घडलं?
  • Exams Rescheduled : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत केला बदल, आता कधी होणार Exam ?
  • अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय, पहिलाच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in