• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेच्या नेवाडा येथे भूकंप की अणुचाचणी ? काय म्हणाले निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे

March 4, 2026 by admin Leave a Comment


एकीकडे इराण आणि इस्राईल-अमेरिकेचे युद्ध सुरु असतानाच अमेरिकेच्या नेवाडात भूकंपाचे हादरे बसण्याची घटना घडली आहे. मात्र, नेवाडा येथे अमेरिका अण्वस्राच्या चाचण्या करत असते. त्यामुळे या भूकंपाच्या हादऱ्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याशी टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधीने केलेली ही बातचीत..

निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले की, 1992 नंतर अमेरिकेने अधिकृतरित्या कुठलीही क्रिटिकल न्यूक्लिअर टेस्ट केलेली नाही, पण अमेरिकेच्या नेवाडा न्यूक्लिअर टेस्टिंग सेंटरवर तो वेळोवेळी सब क्रिटिकल न्यूक्लिअर टेस्ट तो करीत असतो. एकीकडे जगाचे लक्ष पश्चिम आशियातील संघर्षावर लागलेले असताना नेवाडामध्ये वेगवेगळ्या सब क्रिटिकल न्यूक्लियर टेस्ट अमेरिकेने केलेल्या असाव्यात असेही त्यांनी सांगितले. मागच्या एका आठवड्यामध्ये 100 शंभराहून अधिक वेळा 3.9 एवढ्या तीव्रतेचे सौम्य धक्के जाणवल्याचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. इकडे पश्चिम आशियातील संघर्षाकडे जगाचे लक्ष लागलेले असताना अमेरिका गुप्त पद्धतीने अशा प्रकारच्या टेस्टिंग करते किंवा बंकर बस्टर बॉम्बची किंवा लेटेस्ट शस्रांची चाचणी करतोय या सगळ्या संशयाला अधिक बळ मिळतं असेही निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी म्हटले आहे.

दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर हल्ला झाल्यामुळे एक प्रकारे संपूर्ण जगातील हवाई वाहतूक डिस्टर्ब झाली आहे. मुख्यतः पश्चिम आशियाच्या हवाई हद्दीतून जाणारे विमाने बरीचशी रद्द झाली आहेत, त्यामुळे हजारो प्रवासी पश्चिम आशियातील वेगवेगळ्या विमानतळावर अडकून पडले आहेत. दुबई हे जगातील सर्वात महत्त्वाचे कमर्शियल सेंटर मानले जाते. वेगवेगळ्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचबरोबर मीडिया सेंटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर दुबईवर असा हल्ला होत असेल जर दुबईची अर्थव्यवस्था अशा प्रकारच्या संघर्षाने बाधित होत असेल तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्था सुद्धा परिणाम होऊ शकतो असे सतीश ढगे यांनी सांगितले.

इराण हल्ल्याचा दुबईतील व्यवसायावर परिणाम होईल का ?

दुबई हे जगातील सर्वात मोठे आर्थिक कमर्शियल सेंटर मानले जाते. मीडिया सेंटर असो किंवा जागतिक सप्लाय लाईनमध्ये सुद्धा दुबईचा विशेष महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पर्यटक हे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर जातात. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर पश्चिम संघर्षाचा परिणाम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणांची वाहतूक खोळंबली आहे. दुबई हे लवकरात लवकर पूर्ववत करणे हे जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक बनणार आहे.

अमेरिकेच्या युद्धनौकेवर इराणचा हल्ला ?

USS अब्राहम लिंकन ही युद्धनौका जगातल्या सर्वोत्तम एअरक्राफ्ट पैकी एक मानली जाते. अमेरिकेने त्यांच्या 30 ते 40 टक्के स्ट्राईक पॉवरचा भाग इराणला घेरा घालण्यासाठी वापरला आहे.या एअरक्राफ्टच्या माध्यमातून शेकडो फायटर प्लेन त्या ठिकाणी उड्डाण घेऊ शकतात आणि साधारणत: 1 हजार फूट लांबीची 1 लाख टन वजनाची USS अब्राहम लिंकन युद्धनौका USA च्या नौदलाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. इराणच्या आयआरजीसीने USS अब्राहम लिंकनवर चार मिसाईल डागून हानी पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचा दावा इराणने केला आहे. पण आतापर्यंतची जी माहिती पुढे आली आहे, त्यानुसार हा फक्त इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा भाग आहे. एका बाजूला इराण हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की अमेरिकेचे सामर्थ्याला घाबरत नाही, USS ला सुद्धा टार्गेट करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे तशाच प्रकारच्या बातम्या इराणकडून पसरवल्या जात आहेत असे सतीश ढगे यांनी सांगितले आहे.

गरज पडल्यास अमेरिका आर्मी सुद्धा उतरवणार?

खामेनेईला ठार मारणे हा अमेरिकेचा महत्त्वाचा हेतू होता आणि तो त्यांनी अगोदरच पूर्ण केला आहे. सत्तापालट करण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे.सहजासहजी डोनाल्ड ट्रम्प यांना ते शक्य होणार नाही, पण येणाऱ्या काही काळात डोनाल्ड ट्रम्प सैन्य कारवाई करणार की नाही हे कळेल.मात्र, इराणला घाबरवण्यासाठी हे विधान त्यांनी केले असावे असेही ढगे यांनी सांगितले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in