• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेची झोपच उडाली… हवेतच डेंजर गेम, स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील रहस्यमयी घटनेने जग हादरलं, 1600 कोटीचं ड्रोन..

April 10, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर 28 फेब्रुवारीला हल्ला चढवला आणि त्यानंतर सुरू झालेलं युद्ध जवळपास 40 दिवस सुरू होतं. अख्ख्या जगाचं श्वास रोखायला लावणाऱ्या या संघर्षादरम्यान, अखेर बुधवारी युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुज उघडण्यासही इराणने मान्यता दिली. मात्र त्याच दिवशी काहीतासानंतर इस्रायलने लेबनॉनवर हल्ले चढवल्याने, युद्धविराम टिकणार की नाही अशी शंका निर्माण झाली. आजा अमेरिका-इराणचे अधिकारी हे पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा करणार आहे. मात्र याचदरम्यान अमेरिकची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे.

खरंतरं अमेरिकी नौदलाचा एक विशेष निगराणी ड्रोन, MQ-4C ट्रायटन, हा आज होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अचानक गायब झाला. ‘द वॉर झोन’मधील एका वृत्तानुसार, अमेरिकेचा सर्वात महागडा मानल्या जाणाऱ्या या ड्रोनने उड्डाणादरम्यान एक आपत्कालीन सूचनादेखील पाठवली होती. सुमारे तीन तास पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर निगराणी केल्यानंतर, हा ड्रोन इटलीतील सिगोनेला येथील आपल्या तळावर परत येत होता. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट ‘Flightradar24’ नुसार, ड्रोनने अचानक आपला मार्ग इराणच्या दिशेने किंचित वळवला आणि त्याच वेळी 7700 हा एक इमर्जन्सी कोड पाठवला. त्यानंतर ड्रोनने वेगाने खाली उतरण्यास सुरुवात केली आणि थोड्याच वेळात तो रडारवरून नाहीसा झाला, अशी माहिती समोर आली आहे.

हा ड्रोन खाली कोसळला की तो पाडण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतर आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी खुली करण्यास सहमती दर्शवल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी ही घटना घडली असून त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

MQ-4C ट्रायटन ड्रोनचे वैशिष्ट्य

MQ-4C ट्रायटन ड्रोन हा एक अत्यंत प्रगत आणि महागडा ड्रोन असून, त्याची किंमत 200 दशलक्ष डॉलर्स (1600 कोटी रुपयांपेक्षा जास्त) असल्याचे सांगितलं जातं. हा ड्रोन दीर्घकाळ हवेत राहून मोठ्या भागांवर निगराणी करू शकतो. याची रचना विशेषतः सागरी निगराणीसाठी करण्यात आली आहे. तो 50 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर उडू शकतो आणि 24 तासांपेक्षा जास्त काळ सतत काम करू शकतो. त्याची रेंज अंदाजे 7400 नॉटिकल मैल असून त्यामुळेच तो दूरवरच्या अंतरावर निगराणी करू शकतो. हा ड्रोन अनेकदा P-8A पोसायडॉनसारख्या गस्ती विमानांसोबत काम करतो आणि त्यांना महत्त्वपूर्ण माहिती पुरवत असतो. 2025 पर्यंत, अमेरिकन नौदलाकडे असे 20 ड्रोन असतील आणि आणखी 7 खरेदी करण्याची त्यांची योजना आहे.

अमेरिका-इराण युद्धातील खर्चाचा हिशोब

दरम्यान, इराणशी झालेल्या युद्धामुळे, अमेरिकेला मोठा खर्च सहन करावा लागत आहे. अहवालानुसार, अमेरिका दर सेकंदाला अंदाजे 10,300 डॉलर्स, म्हणजेच सुमारे 9.8 लाख रुपये खर्च करते. यातील सर्वात मोठा दैनंदिन खर्च, हा शस्त्रं आणि मिसाइल्सवर होतो, जो अंदाजे 320 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच सुमारे3,040 कोटी रुपये इतका आहे. याव्यतिरिक्त, हवाई वाहतुकीवर दररोज अंदाजे 245 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 2,327 कोटी रुपये) खर्च होतात. सागरी वाहतुकीवर सुमारे 155 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 1,472 कोटी रुपये) खर्च होत आहेत.

मिसाइल डिफेन्स सिस्टीमसाठी कोट्यवधी खर्च

THAAD, पेट्रियाट आणि एजिस सारख्या मिसाइल डिफेन्स सिस्टीमसाठी रोज जवळपास 95 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 902 कोटी रुपये) खर्च केले जातात. गुप्तचर आणि सायबर कारवायांसाठी सुमारे 45 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 427 कोटी रुपये) आणि सैन्यदल व इतर प्रणालींवर अंदाजे 30 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 285 कोटी रुपये) इतका खर्च होतो. परिस्थिती आधीच संवेदनशील आहे असताना हा ड्रोन गायब झाला असून त्यामुळेच तणाव आणखी वाढू शकतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडई क्रेटा आता नव्या अवतारात! जबरदस्त समर एडिशन लाँच, किंमत किती?
  • सांगलीत अघोरी विद्येचा थरार… स्मशानभूमीत सापडली काळी बाहुली अन्… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • Gold Rate : सोने-चांदीच्या भावात मोठा बदल, नवे दर जाहीर; एका तोळ्यासाठी मोजावे लागणार…
  • IPL 2026 : आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावणारे 5 फलंदाज, अनकॅप्ड खेळाडू पहिल्या स्थानी
  • Ashok Kharat | रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in