• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेचा इराण युद्धादरम्यानच भारताला मोठा दणका, थेट चाैकशी सुरू, 16 देशांच्या यादीत…

March 12, 2026 by admin Leave a Comment


मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका संबंध तणावात आहेत. सतत भारतावर अनेक निर्बंध लादताना अमेरिका दिसत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेकडून भारताला मोठा दणका देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने परदेशी औद्योगिक उत्पादनाबाबत एक नवीन व्यापार चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी सुरू करण्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. हैराण करणारे म्हणजे या यादीत भारताच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला. अमेरिकेने भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता अनेक मोठे निर्बंध भारतावर लादली. यामुळे भारत आणि रशियाची 70 वर्षांची मैत्री धोक्यात आली. इराणविरोधात अमेरिका थेट युद्ध करत आहे, याचा फटका फक्त इराणलाच नाही तर अनेक आखाती देशांना बसताना दिसत आहे. आखाती देशांवर मोठे हल्ले इराणकडून करण्यात आली. तेल रिफायनरीला या युद्धात टार्गेट केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण हार स्वीकारताना दिसत नाही.

आर्थिक आणीबाणीचा हवाला देत ट्रम्प यांनी लादलेले मागील आयात शुल्क अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता थेट परदेशी औद्योगिक उत्पादनाबाबत एक नवीन व्यापार चौकशी सुरू अमेरिकेने सुरू केली. यादीत 16 देशांच्या नावाचा समावेश आहे आणि त्यापैकी एक भारत देखील आहे. भारताने अमेरिकेसोबत व्यापार करार केले, यासोबतच रशियाकडून तेल खरेदीही कमी केली होती. मात्र, अमेरिका भारताच्या विरोधात निर्णय घेताना दिसतच आहे.

भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, युरोपियन युनियन, मेस्किको, सिंगापूर, मलेशिया, बांगलादेश, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, स्वित्झर्लंड, नॉर्वे या देशांचा समावेश आहे. जेमिसन ग्रीर म्हणाले की, अमेरिकेचा असा विश्वास आहे की अनेक प्रमुख व्यापारी भागीदारांनी त्यांची उत्पादन क्षमता इतकी वाढवली आहे, त्यामुळे आमच्या देशांतर्गत उत्पन्नावर थेट याचा परिमाम होत आहे.

ग्रीर पुढे बोलताना म्हणाले की, अमेरिका यापुढे इतर देशांकडून आपला औद्योगिक पाया कमकुवत होऊ देणार नाही. म्हणजे आता ही चाैकशी पूर्ण झाल्यानंतर अमेरिका काही पाऊले व्यापाराबाबत या देशांविरोधात उचलू शकते. दुसरीकडे भारतासोबत मोठे व्यापार करार करत स्वत: च्या वस्तूंसाठी भारतीय बाजारपेठ अमेरिकेने खुली करून घेतली. मात्र, आता वेगळी चाल अमेरिकेकडून खेळली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा
  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in