• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमिताभ यांचे खरे आडनाव ‘बच्चन’ नाही, वडीलांनी या कारणाने बदलले, बिग बी यांनी सांगितला तो किस्सा

March 15, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना महानायक म्हटले जाते. त्यांच्या खर्जातील आवाज आणि डायलॉग बोलण्याची पद्धत, एकूण दमदार पर्सनालिटी त्यामुळे लहानमुलांपासून वयोवृद्ध मंडळी त्यांचे चाहते आहेत. त्यांनी केबीसीतून पुन्हा कमबॅक करीत आजही अनेक चित्रपट आणि जाहिरातीत काम करीत आहेत. त्यांच्या चित्रपटातील डॉयलॉग देखील लोक लक्षात ठेवतात. परंतू या महानायक बिग बी यांचे ‘बच्चन’ खरे सरनेम नाही हे अनेकांना माहिती नसेल ? स्वत: एका मुलाखती अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातील सर्व माहिती सांगितली आहे.

अमिताभ यांचे खरे सरनेम हे आहे

अलिकडे एक इंस्टाग्राम अकाऊंट सेलिब्रिटी डिमांडने अमिताभ बच्चन यांचा एक जुना इंटरव्यूह शेअर केला आहे. ही मुलाखत खूपच व्हायरल होत आहे.या मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांच्या बद्दल मोकळेपणाने अनेक गोष्टी सांगितल्या आहे. त्यांनी सांगितले की ‘बच्चन’ हे त्यांचे खरे आडनाव नाही. ते म्हणाले की आमचे आडनाव ‘श्रीवास्तव’होते. मी या घराचा पहिला मुलगा असेल ज्याने स्वत:च्या नावामागे ‘बच्चन’हे आडनाव लावले आणि या नावाने मला ओळख मिळाली असे अभिमानाने त्यांनी या मुलाखतीत सांगितले. आज हे बच्चन हे नाव त्यांची ओळख बनले आहे, संपूर्ण जग या नावानेच त्यांना ओळखते.

येथे पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Celebritydemand (@celebritydemand)

या खास कारणाने बदलले नाव

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन एक महान कवी होते. आणि ते बच्चन या टोपण नावाने कविता लिहायचे. जेव्हा अमिताभ बच्चन यांना शाळेत एडमिशन करायचे होते. तेव्हा त्यांच्या वडीलांनी त्यांचे आडना नाव ‘बच्चन’लिहिले. यामागे त्यांचा असा एक विचार होता. हरिवंश राय बच्चन यांनी इच्छा होती की त्यांच्या मुलांना ओळख जातीने होऊ नये. त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखले जावे. बिग बी यांनी या मुलाखतीत सांगितले की वडील कायस्थ होते तर आई शीख परिवारातील होती. अशामुळे बच्चन आडनाव मिळाल्याने जातीची ओळख मागे राहिली.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिकडे जग युद्धाच्या चर्चेत गुंतलं अन् इकडे चीनने पाकिस्तानचा लचकाच तोडला, पाकला हादरवणारं असं काय घडलं?
  • MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट
  • सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
  • Asha Bhosle last rites LIVE : महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंवर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • US-Iran Tension : फक्त काही तास… पुन्हा युद्धाचा भडका, ट्रम्प भयंकर संतापले, जगात हाहाकार उडणार, आता..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in