• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी

April 10, 2026 by admin Leave a Comment


प्रत्येकाची इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी अमरनाथ यात्रा करून यावी. दरवर्षी लाखो लोक अमरनाथ यात्रेला निघतात. तर यंदा म्हणजेच 2026 च्या यात्रेची तयारी आधीच सुरू झाली आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिल रोजी नोंदणी सुरू होणार आहे. त्यानुसार अंदाजे जुलै महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही यावर्षी अमरनाथ यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. विशेषतः यात्रेदरम्यान तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये केवळ कपडेच नव्हे, तर इतर काही आवश्यक वस्तू असणे महत्त्वाचे आहे. कारण अमरनाथ यात्रा करताना अनेक खूप लाबंचा प्रवास करावा लागतो.

अमरनाथ यात्रा म्हंटली की प्रत्ये शिवभक्त तसेच पर्यटक अमरनाथ यात्रा करण्याचा प्लॅन करतात. त्यामुळे याठिकाणी येणारा लाखो भाविकांना कोणत्याही समस्यांचा त्रास होऊ नये यासाठी अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळ अनेक प्रकारची तयारी करते, ज्यामध्ये तुमच्या शारीरिक फिटनेस कसे आहे हे पाहणे. तसेच यात्रे दरम्यान आरोग्य शिबिरांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे यांचा समावेश असतो. एवढे असताना सुद्धा तुम्ही तुमच्या बॅगेत प्रवासादरम्यान उपयोगी पडतील अशा काही वस्तू असणे महत्त्वाचे आहे. चला तर मग कोणत्या वस्तु सोबत ठेवणे महत्वाचे आहे ते जाणून घेऊयात.

सर्वात महत्त्वाचे आहेत तुमची कागदपत्र

तुम्ही जर अमरनाथ यात्रेला जात असाल, तर तुमच्या बॅगेत थर्मल जॅकेट, स्वेटर, हातमोजे आणि मफलर यांसारखे गरम कपडे नक्कीच ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची स्वत:ची कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा. ही कागदपत्रे अशा ठिकाणी ठेवा जिथे ती हरवणार नाहीत आणि तुम्हाला गरजेच्या वेळेस जास्त शोधा शोध करावी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. तुमचे ओळखपत्र, आधार कार्ड, तुमची प्रवास नोंदणी स्लिप आणि प्रवास विमा यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.

प्रथमोपचार किट

अमरनाथ यात्रेसाठी तुमची बॅग भरताना, दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू बॅगेत भरणे ती म्हणजे एक प्रथमोपचार किट. त्यात वेदनाशामक स्प्रे, डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलटी, मळमळ आणि इतर आजारांवरील औषधे असावीत. (तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या) याव्यतिरिक्त तुम्ही बँडेजेस, किरकोळ जखम बरी करण्यासाठी ट्यूब आणि पट्ट्यांचाही समावेश करावा.

इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत ठेवा

तुमच्या बॅगमध्ये ठेवण्याची तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणे. त्यात चार्जर, पॉवर बँक, टॉर्च आणि काही अतिरिक्त बॅटरी यांचा समावेश असावा. यामुळे गरजेच्या वेळी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री होईल. कधीकधी प्रवासात तुम्हाला फोन चार्जिंग पॉईंट्स मिळतीलच असे नाही किंवा पुरेसा प्रकाश असेलच असेही नाही.

बदलत्या हवामानानुसार साहित्य

तुम्ही तुमच्या बॅकपॅकमध्ये हवामानापासून सेफ्टी साहित्य नक्कीच ठेवावे. अमरनाथ यात्रे दरम्यान डोंगरांभागांमधून प्रवास करावा लागतो तेव्हा जास्त थंडी वातावरण असतं हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे प्रत्येकजण बूट, हातमोजे आणि जॅकेट यांसारख्या उबदार वस्तू सोबत ठेवतो. पण त्याव्यतिरिक्त तुमच्याकडे एक वॉटरप्रूफ बॅग कव्हर, एक छत्री, एक रेनकोट आणि चांगली पकड असलेले बूट देखील असायला हवेत.

हलके खाद्यपदार्थ

तुम्ही तुमच्या बॅगमध्ये असे खाद्यपदार्थ ठेवावेत जे खाताना जास्त त्रास होणार नाही. तसेच शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ सोबत ठेवा. तसेच तळलेले पदार्थांचे सेवन टाळा. भाजलेले चणे, डार्क चॉकलेट आणि सुकामेवा यांसारख्या वस्तू सोबत ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची बाटली.

या गोष्टी जपून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे

तुम्ही तुमच्या बॅगेत सनस्क्रीन, सनग्लासेस, टोपी, काठी, हँड सॅनिटायझर, मास्क इत्यादी वस्तू देखील ठेवल्या पाहिजेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in