• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचं निधन; हा गंभीर आजार ठरला मृत्यूचं कारण

February 18, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रवीणा देशमुख यांचं निधन झालं आहे. त्यांनी ‘रेडी’ या चित्रपटात अभिनेता सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. तर नुकत्याच त्या इमरान हाश्मीच्या ‘तस्करी’ या वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. बॉलिवूडसोबतच त्या मराठी कलाविश्वातही सक्रिय होत्या. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रवीणा यांनी 17 फेब्रुवारी रोजी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. प्रवीणा यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्या निधनाची माहिती दिली.

‘आम्ही अत्यंत दु:खाने हे कळवत आहोत की प्रवीणा देशपांडे यांचं 17 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. स्थळ- हिंदू स्मशानभूमी, चकाला पारशीवाडा, अंधेरी पश्चिम’, अशी पोस्ट त्यांच्या कुटुंबीयांनी लिहिली होती. मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी दुपारी प्रवीणा यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीणा या 2019 पासून मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. किमोथेरपीमुळे त्यांच्या त्वचेवर पुरळ उठले आणि पाठदुखी आणखी तीव्र झाली होती. त्यांचं बोन मॅरो ट्रान्सप्लांटदेखील झालं होतं. 2024 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीणा त्यांच्या आजारपणाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. “माझ्या त्वचेवर सुरुवातीला लहान पुरळ उठण्यास सुरुवात झाली होती. नंतर ती हळूहळू पसरली. 2022 मध्ये उपचारांच्या पहिल्या फेरीनंतर मला तीव्र पाठदुखीचा त्रास झाला. त्यामुळे मला समजलं की आता कॅन्सरवरील उपचार सुरू करण्याची वेळ आली आहे. मी सप्टेंबरमध्ये एका वेब सीरिजचं शूटिंग पूर्ण केलं आणि त्याच महिन्यात किमोथेरपीसाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर माझं बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालं”, असं त्यांनी सांगितलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pravina Deshpande (@pravinadeshpande)

कर्करोगाशी झुंज देताना पती आणि कुटुंबाने त्यांची खूप साथ दिली होती. “माझे पती अनिरुद्ध देशपांडे, दोन्ही मुलं, सून आणि जवळचे नातेवाईक मला कधीही एकटं राहू देत नव्हते. ते आळीपाळीने गेस्ट रुममध्ये बसून व्हिडीओ कॉलद्वारे मला प्रोत्साहन देत होते. त्यांच्यामुळे मला लवकर बरं होण्याची आशा मिळाली. माझ्या भाचीने तिचे लांबलचक केस कापले आणि माझ्या पुतण्याने टक्कल केलं. त्यामुळे अशा काळात मजबूत आधार प्रणाली असणं अत्यंत महत्त्वाचं आहे”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या होत्या.

प्रवीणा देशपांडे यांनी ‘घर एक मंदिर’, ‘कर्म अपना अपना’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ आणि ‘कुमकुम’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय त्यांनी ‘रेडी’, ‘बॉम्बे टॉकिज’, ‘एक व्हिलेन’, ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’, ‘मान्सून शूटआऊट’, ‘गब्बर इज बॅक’, ‘अलिगड’, ‘ब्लॅकमेल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. वेब सीरिजमध्येही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘द फॅमिली मॅन 3’मध्ये त्यांनी मनोज वाजपेयीच्या आईची भूमिका साकारली होती.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in