• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्धात चीन अस्वस्थ, थेट उडाली झोप, अब्जावधीचे नुकसान…

February 28, 2026 by admin Leave a Comment


अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला. आठ दिवसांपूर्वी पाकने मोठा हवाई हल्ला अफगाणिस्तानवर केला. त्याचा बदला तालिबानने घेतला. यावेळी तालिबानच्या निशाण्यावर पाकिस्तानच्या सैन्य चाैक्या होत्या. तब्बल 55 पाकिस्तान सैनिकांना ठार करत थेट 15 चाैक्यांवर अफगाणिस्तानने ताबा मिळवला. यानंतर पाकिस्तानने काबूल आणि कंधारवर मोठा हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात तब्बल 130 लोक ठार झाल्याचे स्वत: पाकिस्तानने सांगितले. आता तालिबान अधिक आक्रमक झाल्याचे दिसत असून जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला उडवू अशी मोठी धमकीच थेट तालिबानने दिल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही देशातील युद्ध अधिक पेटताना दिसत आहे. एकमेकांवर जोरदार हल्ले केली जात आहेत, सैनिकांसह सामान्य लोकांचे जीव जात आहेत. मात्र, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धाचा खरा धसका चीनने घेतला.

सध्याच्या परिस्थितीला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशातील आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. चीनला कोणत्याही परिस्थितीत स्थिरता हवी आहे, कारण चीन-पाकिस्तान आर्थिक संबंध आहेत. युद्धामुळे CPEC धोक्यात येईल, त्यामुळे ते चीनसाठी एक संधी आणि धोका दोन्ही आहे. चीनला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शांतता हवी आहे.

जर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्ध अधिक पेटत गेले तर त्याचा सर्वाधिक धोका चीनला आहे. कारण अमेरिकेचा पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप वाढेल आणि चीनला ते नको आहे. पाकिस्तानवर अगोदरच कर्जाचा डोंगर आहे आणि त्यामध्ये हे युद्ध पेटले तर पाकिस्तान अमेरिकेची मदत घेईल, याचाच चीनला सर्वाधिक धोका आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मैत्री जगाला माहिती आहे. अफगाणिस्तानमध्ये स्थिती स्थिर असावी, ही भारताची देखील भूमिका असणार आहे. मात्र, या युद्धाच्या स्थितीत पाकिस्तानकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले. भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट सऊदीमध्ये फोन केल्याचीही माहिती या युद्धाच्या स्थितीत मिळत आहे. सऊदीसोबत पाकिस्तानने संरक्षण करार केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in