• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अपोलो हॉस्पिटल्सकडून वर्षभर 24×7 सेवा देण्याची हमी, IHD 2026 मध्ये Hospital of the Future ची घोषणा

February 1, 2026 by admin Leave a Comment


हैदराबाद, 31 जानेवारी 2026 : अपोलो हॉस्पिटल्सचा International Health Dialogue (IHD) 2026 हैदराबादमध्ये संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत प्रत्यक्ष व ऑनलाइन मिळून 27,000 हून अधिक सहभागी उपस्थित होते. Global Voices, One Vision या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात भारत व परदेशातील चिकित्सक, रुग्ण सुरक्षितता तज्ज्ञ, मान्यताप्राप्ती (accreditation) क्षेत्रातील नेते, तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि आरोग्य धोरणकर्ते एकत्र आले. नेतृत्व-आधारित सुरक्षितता, प्रणाली रचनेतील समता, तसेच मोजता येणारे परिणाम व विश्वास निर्माण करणाऱ्या जबाबदार डिजिटल परिवर्तनावर सखोल चर्चा झाली. परिषदेला जगभरातील 75 पेक्षा अधिक संस्थांकडून 300 हून अधिक शोधनिबंध आणि 120 हून अधिक पुरस्कार नोंदी प्राप्त झाल्या, ज्यातून सहभागाची व्यापकता व वैविध्य स्पष्ट झाले.

या कार्यक्रमात भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ धोरणकर्ते आणि आरोग्यमंत्री सहभागी झाले. यामध्ये खास करून के. वोंडा विश्वेश्वर रेड्डी (लोकसभा खासदार, चेवेल्ला, तेलंगणा), जोनाथन बी. पर्लिन (President & CEO, Joint Commission International – JCI), कार्स्टन एंगेल (CEO, International Society for Quality in Health Care – ISQua), अतुल मोहन कोचर (CEO, NABH), जीन रोझेअर इबारा (आरोग्य व लोकसंख्या मंत्री, काँगो प्रजासत्ताक), ग्रेस आयेंसु-डॅन्क्वाह (उप आरोग्यमंत्री, घाना), सारा क्लेटो रियाल (आरोग्यमंत्री, दक्षिण सुदान) आणि हुआʻकावामेलिकू सियाओसी सोवालेनी (आरोग्यमंत्री, टोंगा) यांचा समावेश होता.

IHD 2026 चे उद्घाटन करताना Apollo Hospitals Group च्या Joint Managing Director डॉ. संगिता रेड्डी यांनी तंत्रज्ञान-आधारित परिवर्तनाच्या पुढील टप्प्याची घोषणा केली. यामध्ये हैदराबादमध्ये उभारण्यात येणारे Hospital of the Future तसेच रुग्णालयांच्या पलीकडे विस्तारलेली Health System of the Future उभारण्याची बांधिलकी समाविष्ट आहे. त्या म्हणाल्या,’आरोग्यसेवा ही आता संस्थांपुरती मर्यादित न राहता प्रणालीकडे, प्रसंगाधारित उपचारांपासून सतत आरोग्य देखरेखीपर्यंत आणि मॅन्युअल प्रक्रियांपासून AI-आधारित कार्यप्रवाहांकडे सरकत आहे. तंत्रज्ञान हा केवळ पूरक घटक नाही; तो आरोग्यसेवेचा कार्यरत पाया बनत आहे. मात्र तो मानव-नेतृत्वाखाली व सहानुभूतीप्रधान राहिला पाहिजे. आपली आव्हाने सरळरेषीय वाढीने सुटणार नाहीत; आरोग्यसेवेला घातांकीय (exponential) उपायांची गरज आहे.’

डॉ. संगिता रेड्डी यांनी Health System of the Future साठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये गैर-वैद्यकीय रुग्ण विनंत्यांसाठी Dial50, Microsoft सोबत Clinician Copilot आणि Patient Copilot विकसित करण्यासाठी भागीदारी (human-in-the-loop governance सह), जोखीम मोजमाप व मार्गदर्शित वेलनेस पाथवे असलेले प्रतिबंधात्मक आरोग्य AI प्लॅटफॉर्म (जो सध्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून लाखो API कॉल्स हाताळतो) तसेच 40 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांना सेवा देणारे Apollo 24/7 हे डिजिटल प्रवेशद्वार यांचा समावेश आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘AI ने माणसाचा निर्णय काढून घ्यायचा नसून, कंटाळवाणे व वेळखाऊ काम दूर करायचे आहे. बुद्धिमत्ता जेव्हा मागील नोंदींच्या परीक्षणाऐवजी प्रत्यक्ष-वेळ हस्तक्षेपाकडे वळते, तेव्हा सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होते.’ त्यांनी झिरो code blue घटना असलेली रिमोट मॉनिटरिंग व्यवस्था आणि 5G-सक्षम रुग्णवाहिका यांचा उल्लेख करत आपत्कालीन प्रतिसादापर्यंत क्लिनिकल देखरेख विस्तारल्याचे स्पष्ट केले.

व्हर्च्युअल संबोधनात Apollo Hospitals चे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी जाहीर केले की Apollo Hospitals आता शनिवार-रविवार व सुट्ट्यांसह वर्षातील 365 दिवस, 24×7 कार्यरत राहतील. ते म्हणाले, ‘लोक आजारी पडतात तेव्हा आरोग्यसेवा झोप घेऊ शकत नाही. आरोग्यसेवा दररोज उपलब्ध असली पाहिजे, केवळ कामकाजाच्या दिवशी नव्हे. तंत्रज्ञानाने करुणेला सेवा द्यावी, तिची जागा घेऊ नये. आरोग्यसेवेचे भविष्य केवळ रुग्णालयांमध्ये नाही, तर दैनंदिन जीवनात आहे.’

रुग्ण सुरक्षितता व आरोग्यसेवांवरील सरकारच्या धोरणात्मक भूमिकेबाबत बोलताना खासदार के. वोंडा विश्वेश्वर रेड्डी म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही भारत सरकारची एक महत्त्वाची रणनीतिक प्राधान्ये आहेत—विशेषतः आरोग्य, शेती आणि शिक्षण क्षेत्रासाठी. AI मुळे वैद्यकीय कौशल्य संस्थात्मक स्वरूपात जतन होईल आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचेल. डेटाची गुणवत्ता, सूक्ष्मता (granularity) आणि पूर्वग्रहांचा अभाव हे AI च्या यशाचे मुख्य निर्धारक असतील. भारताची सार्वजनिक डिजिटल पायाभूत रचना मोठ्या प्रमाणावर, परस्परसुसंगत नवकल्पना उभारण्यासाठी मजबूत आधार देते.’

Apollo Hospitals Enterprise Limited च्या Hospitals Division चे President & CEO डॉ. मधु ससिधर यांनी सामायिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, ‘आज रुग्ण सुरक्षितता ही प्रशासन, AI, नियमन आणि सहकार्य यांच्या संगमावर उभी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने स्वतंत्र प्रयोगांपुरते न राहता मोठ्या प्रमाणावर मूल्य द्यायला हवे. गुणवत्ता आणि परिणाम हे गृहीत धरून चालत नाहीत; त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.”

Joint Commission International (JCI) चे President & CEO जोनाथन बी. पर्लिन यांनी आरोग्यसेवेमधील विश्वासावर आपले मत मांडताना म्हटले, ‘सुरक्षित, प्रभावी आणि सहानुभूतीपूर्ण सेवा हाच विश्वासाचा पाया आहे—सर्व लोकांसाठी, नेहमी, सर्व ठिकाणी. जबाबदार AI ही आरोग्यसेवेच्या कार्यपद्धतीत समाकलित असली पाहिजे, वरून जोडलेली नव्हे. विविध सेवा-स्थळांमध्ये सातत्य, कार्यात्मक एकात्मता आणि स्पष्ट जबाबदारी यांवरच विश्वास अवलंबून असतो.’

कार्यक्रमात ‘Unscripted with Mr Arnab Goswami’ हे विशेष सत्रही झाले. Republic Media Network चे Editor-in-Chief अर्नब रंजन गोस्वामी यांनी Apollo Health Co Ltd तसेच Apollo Pharmacies Ltd यांच्या Executive Chairperson श्रीमती शोभना कामिनेनी यांच्याशी रंगलेली मुक्त संवादात्मक चर्चा सादर केली. या चर्चेत तंत्रज्ञानामुळे खरोखर आरोग्यपरिणाम सुधारू शकतात का, जागरूकता कृतीत का रूपांतरित होत नाही, आणि दैनंदिन जीवनात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे स्वरूप कसे असावे, यावर सखोल विचारमंथन झाले.

मुख्य कार्यक्रमासोबतच THNX तर्फे IHD 2026 दरम्यान Startup Dome चे आयोजन करण्यात आले. Startup Réseau यांच्या भागीदारीत आयोजित या उपक्रमात निवडक स्टार्टअप्सना चिकित्सक व गुंतवणूकदार पॅनल्ससमोर सादरीकरणाची संधी देण्यात आली, ज्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित सहकार्याचा मार्ग खुला झाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये
  • GK : श्रीकृष्णाची सर्वात आवडती बासरी कोणती होती? एकदा वाचाच!
  • बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता रोहित शेट्टी टार्गेटवर, लॉरेन्स बिश्नोई गँगचा शुभम लोनकर कोण आहे?
  • Budget 2026: फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेंडिंग करणाऱ्यांना मोठा झटका; बजेटमधल्या घोषणेनं कोसळलं शेअर मार्केट
  • आता 12 दिवसांनी सगळं…दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर बड्या नेत्याचं मोठं विधान; राजकारणात खळबळ!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in